एक्स्प्लोर
आंबेडकर भवन पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवन पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबईच्या दादरमध्ये ऐतिहासिक आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिटिंग होती. धोकादायक इमारत झाल्याने मुंबई महापालिकेने या इमारतीला नोटीस पाठवली होती. त्यानंतर या इमारतीची मालकी असलेल्या आंबेडकर ट्रस्टने ही इमारत जमीनदोस्त केली होती.
मात्र यानंतर आंबेडकर कुटुंबीयांसोबत आंबेडकरी संघटना या पाडकामाविरोधात रस्त्यावर उतरल्या. शिवाय आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली होती.
दरम्यान, आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात भायखळ्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून विधानभवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
विश्व
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
