मूड राज्याचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर जनता किती खुश?
यंदा कोरोनाचं संकट, बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर जनता किती खुश आहे? पाहा..
मुंबई : लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दोन वर्ष लोटली आहेत. तर राज्यात महाविकास आघाडी सरकारला वर्ष उलटून गेलं आहे. यंदा कोरोनाचं संकट, आंदोलना आणि अनेक राजकीय घडामोडींमुळे देशातील राजकीय स्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्व्हे घेऊन देशाचा मूड जाणून घेतला. राज्यातील जनता ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर किती समाधानी आहे. याबाबत या सर्व्हेतून मतं जाणून घेतली गेली.
2019 ला विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि महाविकास आघाडी सरकारची राज्यात स्थापना झाली. ठाकरे सरकार सत्तेत आलं आणि एकामागून एक संकटं येत गेली. कोरोना, अतिवृष्टी अशा मोठ्या संकटाने राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थिती हा सर्व्हे खूप गोष्टी सांगून जात आहे.
असा आहे सर्व्हे :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनता समाधानी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 45 टक्के जनता समाधानी असल्याचे सर्व्हेतून समोर आलं आहे. यात खोलात जाऊन पाहायचं म्हटलं तर..
- मुख्यमंत्र्यावर 46 टक्के लोक खूप समाधानी
- 32 टक्के समाधानी
- 20 टक्के असमाधानी
- सरासरी कामगिरी 58 टक्के
देशात चांगली कामगिरी असलेले मुख्यमंत्री
नवीन पटनायक (ओडिशा)
अरविंद केजरीवाल (दिल्ली)
वाय.एस. जगमोहन रेड्डी ( आंध्र प्रदेश)