एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 जानेवारी 2020 | गुरूवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. माझ्या भाषणाचे अर्थाचे अनर्थ काढले जात आहेत, मी इंदिरा गांधींचा समर्थक; वादग्रस्त वक्तव्यानंतर जिंतेंद्र आव्हाड यांचं स्पष्टिकरण
2. मध्य रेल्वेवरील पहिल्यावहिल्या एसी लोकलचं आज उद्घाटन, दुपारी 3 वाजता सीएसएमटीवरून लोकलला हिरवा झेंडा, दिवसभरात 16 फेऱ्या
3. मेट्रोच्या आरे कारशेडचं स्थलांतर अव्यवहार्य असल्याचा अहवाल बंधनकारक नाही, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं पुन्हा वादंग, तर मेट्रो 3च्या भुयारीकरणाचा 25वा टप्पा पूर्ण
4. थेट जनतेतून संरपंचाची निवड रद्द, निवडून आलेल्या सदस्यांमधूनच होणार निवड, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
5. मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला; दोन जण जखमी तर दोन गाड्यांचा चक्काचूर
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 जानेवारी 2020 | गुरूवार | ABP Majha
6. मराठी शाळेत शिकले म्हणून पात्र उमेदवारांनाही नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह
7. मुंबई आयआयटीत राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यास कारवाई होणार, हॉस्टेलची नवी नियमावली जाहीर, सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक
8. अर्थमंत्रीपदी नवीन व्यक्ती नेमण्याच्या संघाच्या सूचना, सूत्रांची माहिती, तर नरेंद्र मोदींनी निर्मला सीतारमण यांच्या हातून सूत्र काढून घेतली, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
9. चीनमध्ये कोरोना व्हायरसचे 132 बळी, 27 भारतीय हुबे युनिव्हर्सिटीत अडकले, गडचिरोलीतील 7 जणांचा समावेश, भारतीय दूतावासाकडे मदतीची मागणी
10. रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सनसनाटी विजय, हॅमिल्टनमध्ये टीम इंडियाचा ट्वेन्टी ट्वेन्टीत ऐतिहासिक मालिका विजय
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement