एक्स्प्लोर
‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या
रशियात शेकडो मुलांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ब्ल्यू व्हेल गेमनं आता भारतात शिरकाव केला आहे.
मुंबई : रशियात शेकडो मुलांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ब्ल्यू व्हेल गेमने आता भारतात शिरकाव केला आहे. 'ब्ल्यू व्हेल' या जीवघेण्या गेमचं थैमान आता भारतातही येऊन पोहचलं आहे. कारण याच ब्ल्यू व्हेल गेमच्या नादापायी अंधेरीतल्या 14 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला आहे.
मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
मात्र, मनप्रीतच्या कृत्याला आत्महत्या म्हणायचं की हत्या, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांपासून पोलिसांनाही पडला आहे. कारण ब्ल्यू व्हेल या जीवघेण्या खेळाच्या नावाखाली मनप्रीतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचं समोर येत आहे.
काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक 'मास्टर' मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो
स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.
ब्ल्यू व्हेल गेमच्या गर्तेत अडकलेल्या मनप्रीतला आत्महत्या करण्याचा आदेश कोणत्या मास्टरने दिला होता, हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. शाळेत असतानाच मुलांच्या हातात मोबाईल देणाऱ्या पालकांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
मनप्रीतप्रमाणे किती मुलं ब्ल्यू व्हेलच्या विळख्यात अडकली आहेत हे सांगता येणं कठीण आहे. मात्र, मुलांना या जीवघेण्या खेळापासून वाचवण्यासाठी पालकांनाच पाऊलं उचलावी लागणार आहेत.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement