एक्स्प्लोर
हार्बर मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची लोकल धावणार?
मुंबई : मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण या मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची ट्रेन धावण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या लोकल ट्रेनला हिरवा कंदील दाखवतील
हार्बर मार्गावर डीसी टू एस विद्युतप्रवाह परिवर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेने 10 नव्या फेऱ्यांऐवजी 12 डब्यांची लोकल चालवण्याला प्राधान्य दिलं. प्रवासी संख्या वाढत असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला.
काही दिवस 12 डब्यांची एकच लोकल हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहे. 12 डब्यांच्या या लोकलमुळे प्रवासी संख्येत 33 टक्के वाढ होणार आहे.
सध्या या मार्गावर 9 डब्यांच्या 36 गाड्यांमार्फत दिवसभरात 590 फेऱ्या चालवल्या जातात. या 36 गाड्यांना प्रत्येकी 3 डबे जोडल्यास प्रवासी क्षमता 33 टक्क्यांनी वाढते. ही क्षमता वाढवणं हे 9 डब्यांच्या 190 जादा सेवा चालवण्यासारखं आहे.
हार्बर मार्गावर मंगळवारी मध्यरात्री शेवटच्या ट्रेननंतर 12 डब्यांच्या लोकलची चाचणी घेण्यात आली. याशिवाय 12 डब्यांची गाडी सुरु होण्यापूर्वी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं कामही पूर्ण झाल्याची माहिती, मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते नरेंद्र पाटील यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement