(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईला आयआयएम मिळण्याची शक्यता, 5 सदस्यीय समितीची स्थापना!
Mumbai IIM : देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्यानं नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते. त्यामुळे वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येत असते.
मुंबई : लवकरच मुंबईला देखील आयआयएम (IIM) मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरींग, मुंबईचे आयआयएममध्ये रुपांतर करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्यानं नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते. त्यामुळे वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येत असते. यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
NITIEचं IIM होणार?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) मुंबई ही भारत सरकारने 1963मध्ये स्थापन केलेली, एक स्वायत्त संस्था आहे, जी शिक्षण क्षेत्रातील सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणीकृत आहे. औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रातील तरुणांना शिक्षण देणे, जे नंतर देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी उद्योग आणि व्यवसायांमध्ये त्यांचे करिअर तयार करतात, अशांना घडवण्यात ही संस्था आघाडीवर आहे. आता ही संस्था llM कायद्याच्या कक्षेत येण्याची आशा आहे.
एकमताने आणि शिक्षणमंत्र्यांच्या मान्यतेने, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) मुंबईला llM ACT, 2017 अंतर्गत आणण्याच्या व्यवहार्यतेवर विचारमंथन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
llM कायदा, 2017 अंतर्गत समावेशासाठी संस्थेच्या तयारीचे मूल्यांकन करणे, आयआयएम कायद्यांतर्गत प्रस्तावित समावेशाच्या आवश्यकतेनुसार संस्थेच्या विद्यमान पायाभूत सुविधा आणि गैर-शैक्षणिक कर्मचार्यांच्या पर्याप्ततेच्या पैलूचे परीक्षण करणे, निर्णयाचे आर्थिक परिणाम आणि संस्थेच्या भविष्यातील रोड मॅपचा अंदाज लावणे, पदनाम/आर्थिक वेतनासारख्या कोणत्याही एचआर समस्यांचे मूल्यांकन करणे या सर्व निकषांवर तज्ज्ञ समिती अभ्यास करणार आहे.
हेही वाचा :
- School Bus Fare : पालकांना स्कूल बस भाडेवाढीचा धक्का! तब्बल 30 टक्के भाडेवाढ होणार
- मुंबईतली झोपडी विकसित झाल्यानंतर तीन वर्षात विकता येणार, गृहनिर्माण मंत्रालयाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha