School Bus Fare : पालकांना स्कूल बस भाडेवाढीचा धक्का! तब्बल 30 टक्के भाडेवाढ होणार
School Bus Fare increase : पालकांची चिंता वाढवणारी बातमी. स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
School Bus Fare increase : कोरोना महामारीचा (Corona Virus Pandemic) प्रभाव हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर आता शाळा (Maharashtra Mumbai School Reopen)देखील हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. यातच आता पालकांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. डिझेल दरवाढ ,कर्मचाऱ्यांचे वाढते पगार आणि 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असताना आता स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा 10 फेब्रुवारी पासून पूर्णपणे सुरू होत आहेत. मात्र, स्कूल बसच्या आधीच्या शुल्कामध्ये 30 टक्के शुल्क वाढ करण्याचा स्कूल बस मालक संघटनेने ठरवले आहे
राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षचा रोड टॅक्स जरी माफ केला असला तरी वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असल्याने 30 टक्के भाडे वाढ करणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने करणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांना स्कूल बसने शाळेत पाठवायला सुरू करणार असाल तर तुम्हाला 30 टक्के अधिकचा शुल्क मोजावे लागणार आहे. राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. मागील दोन वर्षापासून या स्कूल बस अनेक ठिकाणी बंद आहेत. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मेंटेनन्स खर्च कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बसने शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.
स्कूल बस वाढवणार असल्याने त्या संदर्भात स्कूल बस मालक संघटना शाळा आणि पालकांसोबत चर्चा करणार आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या इतर बातम्या
Budget 2022: मुंबईसह राज्यातील मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद; 'या' कामांसाठी होणार खर्च