आंबा केवळ फळांचाच नाही तर त्वचेचीही राजा, आंब्याचा फेसपॅक आहे चेहऱ्यासाठी फायदेशीर
आंब्याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. तसेच डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्यात असणाऱ्या अँटिआॅक्सीडंटमुळे व्हिटामिन सी चेहऱ्याला मिळते.
Mango Face Pack : उन्हाळ्याच्या ऋतूत आंबा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. केवळ खाण्यासाठी वापरला जाणारा आंबा हा त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्वचेला साफ करण्यासाठी आंब्याचा फायदा होतो. आंब्याचा फेसपॅक (MANGO FACEPACK) चेहऱ्यावर लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. काय आहेत आंब्याचा फेसपॅक लावण्याचे फायदे आणि तो कसा बनवावा जाणून घेऊ,
आंब्याचा फेसपॅक बनवण्याची सामग्री
पिकलेल्या आंब्याची एक फोड.
एक मोठा चमचा मध (HONEY).
एक मोठा चमचा दही (CURD).
आंब्याचा फेसपॅक कसा बनवला जातो? (How To Make Mango Facepack)
आंबा संपूर्ण बारीक करावा. त्यात एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळा. हा तयार झालेला फेसपॅक मानेवर तसेच चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटं हा चेहऱ्यावर ठेवून कोमट पाण्याने त्याला धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही नियमीत वापरू शकता.
आंब्याचा फेसपॅकचे फायदे (Benefits Of Mango Facepack)
हायड्रेशन
आंब्यामध्ये पाण्याची मात्रा मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने तुमची त्वचा हायड्रेट (Hydrate) राहते. तसेच हवे असणारे मॉइस्चराइजर त्वचेला मिळते. त्वचा मऊ आणि ग्लोइंग (Glowing) बनते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
आंब्यात व्हिटामिन ए (Vitamin A) असल्याकारणाने याचा थेट परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर होतो. वयानुसार चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास या फेसपॅकची मदत होते. तसेच त्वचेवरील फाइन लाइन्स देखील कमी होतात. ज्यामुळे तुमची त्वचा तरूण दिसायला लागते.
चेहऱ्यावर ग्लो येतो
आंब्यात असणारे एंझाईम (Enzyme) चेहऱ्याला हवे असणारे पोषण देते. डेड स्किन (Dead Skin) काढण्यातस मदत करते आणि चेहरा ग्लोइंग बनवते.
ब्लॅकहेड पासून सुटका होते
आंब्यामध्ये अँटिआॅक्सीडंट (Anti-oxidents) असल्याने ब्लॅकहेड (Blackhead) पासून तुमची सुटका होऊ शकते. हा फेसपॅक चेहऱ्यावरील छिद्रांना रिकामे करतो. परिणामी चेहऱ्यावरील ब्लॅकहेड निघून जातात आणि सूज कमी होण्यास मदत होते.
त्वचेचा रंग उजळतो
आंब्यात नैसर्गिक अॅसिड (Natural Acid) असते. जे तुमचा नैसर्गिक रंग परत मिळवून देऊ शकतो. चेहऱ्यावर असणारे डाग, हायपरपिगमेंटेशन (Hyperpigmentation) या फेसपॅकमुळे कमी होण्यास मदत होते. याचा नियमित वापर केला तर अनेक समस्या दूर होतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Space Farming: 'हा' देश करतोय अंतराळात शेती, कशी उगवली जातात अंतराळात पीकं? वाचा सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )