एक्स्प्लोर

जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार

राज्यातील जिल्हा परिषदेला शिकवत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइनच होणार आहेत. यासंदर्भातल्या नियुक्त करण्यात आलेल्या पाच सनदी अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाने तशी शिफारस केलीय. बदल्या कशा असाव्यात या संदर्भात पाच सीईओचा गट अभ्यास करतोय. अभ्यास बदल्यांचा नवा पॅटर्न कसा असेल याची शिक्षकांना उत्सुकता आहे.

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या आता पूर्वीप्रमाणे ऑनलाईनच होणार आहेत. पाच सनदी अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटानं तशी शिफारस केलीय. या शिफारशीची प्राथमिक चर्चा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झाली. आणखी एका वरिष्ठ मंत्र्यांच्या पडताळणीनंतर जुनाच निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्री आग्रही होते. त्यानंतर शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला होता. 25 फेब्रुवारीला राज्यातील शेवटची विभागनिहाय बैठक नागपूर आयुक्तालयात पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व शिक्षक संघटनांची 99 टक्के मते ही बदल्या ऑनलाइनच प्रक्रियेने व्हाव्या, या बाजूची पाहायला मिळाली. जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांवरुन राज्यभर वादळ उठले आहे. या बदल्या ऑफलाइन करण्यासाठी सरकारमधील काही मंत्री आग्रही असल्याची माहिती हाती येतेय. थेट सरपंच पदाच्या निवडीप्रमाणे जनभावना लक्षात न घेता हाही निर्णय बदला जाण्याची शक्यता आहे. ऑनलाइनच्या अभ्यासासाठी शासनाने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त केला होता. मंगळवारी 25 फेब्रुवारीला राज्यातील शेवटची विभागनिहाय बैठक नागपूर आयुक्तालयात पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व शिक्षक संघटनांची 99 टक्के मते ही बदल्या ऑनलाइनच प्रक्रियेने व्हाव्या, या बाजूने व्यक्त झाली. यावेळी अभ्यास गटासमोर आलेले चर्चेचे मुद्दे - ऑनलाइन बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावर असावेत का? पती पत्नी एकत्रिकरणाचे अंतर हे तीस किमीवरून पन्नास कमी करावे का? अवघड क्षेत्र पुनर्निर्मित करण्यात यावेत बोगस प्रमाणपत्र सादर करून शिक्षकांच्या होणाऱ्या बदलीसाठी कारवाईचा पॅटर्न असावा. राज्यातल्या शिक्षक संघटनांची 99 टक्के मत ऑनलाईन बदल्या कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्ह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हा पातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे. संघटनांची बदल्या ऑनलाइनच व्हायला हव्यात अशी मागणी आहे. भाजप सरकारच्या काळातल्या निर्णयामुळे लाचखोरीत थांबली होती. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशी मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांचे सरकारला दिले आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीचे नवे धोरण ठरविण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास विभागाने या संदर्भाचा अभ्यास गट नेमलाय. त्यात पुणे रायगड चंद्रपूर नंदूरबार आणि उस्मानाबादचे सीईओ सदस्य आहेत. हा अभ्यासगट तीन मार्चला सरकारला आपला अहवाल सादर करणार होता. रोहित पवारांचे यांचे आफलाईन बदल्यांना समर्थन? आमदार रोहीत पवार यांचे यांचे आफलाईन बदल्यांना समर्थन? तशा आशयाची एक फेसबुक पोस्ट पवार यांनी केली आहे. खात्याचे नामदार राष्ट्रवादीचे असल्याने या पोस्टटी चर्चा सुरू झाली आहे. रोहीत पवार यांची पोस्ट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या 10-15 वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करता असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कौटुंबीक अडचणींना सामना करावा लागतो. व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, तर दुसरीकडे त्यांच्या कौटुंबीक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही देखील होत आहेत असे आ. रोहीत पवार यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ZP Teachers Online Transfer | शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, फडणवीस सरकारचा निर्णय कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget