एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2 रुपयांसाठी रिक्षाचालकाची अरेरावी, वादात तरुणाचा मृत्यू
मुंबईः रिक्षाचालक आणि प्रवाशांमधला वाद मुंबईकरांसाठी नवा नाही. पण अशाच एका वादामुळं आईनं पोटचा गोळा कायमचा गमावला आहे. कारण अवघ्या 2 रुपयांवरुन झालेला वाद तरुणाच्या जीवावर बेतला.
चेतन आर्चिणेकर हा तरुण गोव्याहून घरी नुकताचत विक्रोळीतील घरी परतला. पण रिक्षावाल्याशी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरुन वाद सुरु झाला आणि जिवावर बेतला. या वादात चेतनचा मृत्यू झाला.
असा झाला वाद
चेतन नुकताच नोकरीला लागला होता. पहिलाच दौरा आटोपून गोव्याहून तो विक्रोळीतल्या घराच्या दारात परतला. पण दारातूनच कायमचा निघून गेला. विमानतळावरून चेतन एका रिक्षाने रात्री दीड वाजता घरी परतला. रिक्षाचं बिल 172 रुपये झालं. सुट्ट्या पैशावरून रिक्षावाला अडला. चेतनने वडिलांकडून 200 रुपये घेतले आणि रिक्षावाल्याला दिले.
चेतनने पैसे देताना या पुढे सुट्टे पैसे ठेव अशी सूचना रिक्षावल्याला केली. तिथेच रिक्षावाल्याने हुज्जत घातली आणि वाद वाढला. रिक्षावाला चेतनला काही तरी बोलून पळू जाऊ लागला. रिक्षावाल्याचा पाठलाग करण्याचा चेतनने प्रयत्न केला. मात्र रिक्षाच चेतनच्या अंगावर उलटला. यात चेतन गंभीर जखमी झाला. दवाखान्यात नेईपर्यंत चेतनचा मृत्यू झाला.
रिक्षाचालकांची मुजोरी कधी थांबणार?
हाताशी आलेलं पोर असं हकनाक गेल्याने आई-बाप चांगलेच कोलमडले आहेत. पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसादला अटक केली आहे. पण अटक केल्याने चेतनचा जीव तर परत येणार नाही. रिक्षावाल्याने काही तरी बोलून पळ काढण्याऐवजी तिथेच थांबून संवाद साधणं गरजेचं होतं.
सगळेच रिक्षावाले मुजोर असतात असं नाही पण मुजोरीच्या घटना या त्यांच्याबाबतच जास्त घडतात. म्हणूनच प्रवासी आता ओला-उबेरसारख्या सेवेकडे वळत आहेत. ज्यांच्याविरोधात सध्या रिक्षावाल्यांची एकजूट झाली आहे. चेतनसोबत जे घडलं तो नियतीचा एक अपघात होता. पण रिक्षावाल्याने थोडा समजुतदारपणा दाखवला असता तर आज चेतननं फक्त 2 रुपयांसाठी जीव सोडला नसता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement