एक्स्प्लोर
महिला दिनीच महिलेची आत्महत्या; मुलगा होत नसल्याने छळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप
जगभरात महिला दिन साजरा होत असताना हिंगोलीत मात्र एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. मुलगा होत नसल्याने व माहेरकडून पैशाची वेळोवेळी मागणी होत असल्याने पीडितेने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या भावाने केलाय.
हिंगोली : जिल्ह्यात येत असलेल्या सेनगाव तालुक्यातील जयपूर या गावात एका महिलेने रविवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक महिला दिनीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर आत्महत्येचे नमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, मुलगा होत नसल्याने व माहेरकडून पैशाची वेळोवेळी मागणी होत असल्याने याच विवंचनेतून पीडितेने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या भावाने केलाय.
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे अंकुश लांभाडे यांचे कुटुंब राहते आहे. घरी पत्नी व दोन मुली असून आई, वडील गावातच वेगळं राहतात. अंकुश लांभाडे यांच्या नावे दोन एक्कर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या दोन्ही मुली आजी-आजोबा कडेच रहतात. आज सकाळी लांभाडे हे शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणी नाही हे पाहून त्यांची पत्नी उमा अंकुश लांभाडे(32)यांनी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास घराचे दरवाजे आतून बंद करून घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारच्या वेळी त्यांच्या नातेवाईकांनी दरवाजा वाजवला असता आतून आवाज येत नव्हता. त्यामुळे त्यांनी हा प्रकार पोलिस पाटलांना सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांनी अंकुश लांभाडे यांना माहिती दिली. ते देखील तातडीने घरी आले व त्यानंतर गावकऱ्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता उमा लांभाडे यांचा मृतदेह फंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
दहावी परीक्षेआधी वाशिममधील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ
मुलगा होत नसल्याने व माहेरकडून पैशाची वेळोवेळी मागणी
या प्रकरणी पोलिस पाटील अमरदास पारीसकर यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली. सेनगावचे पीएयआय बाबुराव जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कऱ्हाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, उमा लांभाडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जागतिक महिला दिनी झालेल्या या घटनेमुळे सेनगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मुलगा होत नसल्याने व माहेरकडून पैशाची वेळोवेळी मागणी होत असल्याने याच विवंचनेतून उमा यांनी आत्महत्या केली आहे. असा आरोप महिलेचा भाऊ गजानन रामभाऊ कोल्हे यांनी केला आहे. या प्रकरणांमध्ये परत एकदा गुन्ह्यात बदल होण्याची शक्यता आहे.
Special Report | चिमुकल्याकडून शाळेत बळीराजावर कविता सादर... अन् त्याच रात्री पित्याची आत्महत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement