एक्स्प्लोर
Advertisement
संवेदनशील उरण का महत्त्वाचं?
उरण (रायगड) : उरण शहरात 4 संशयित तरुण घुसल्याची माहिती मिळत आहे. या संशयितांकडे बंदुका असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बंदुकधाऱ्यांना पाहिल्याची माहितीही देण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलिसांना त्याबाबतचे फोन आल्यानंतर इथे सकाळपासून तपास सुरु करण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.
उरण का महत्त्वाचं?
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका म्हणजे उरण. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर उरण वसल्याने या तालुक्याला वेगळं महत्त्व आहे. आगरी आणि कोळी समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या या तालुक्यात मासेमारी आणि भात शेती प्रमुख व्यवसाय आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणमध्ये भारतातील सर्वात मोठं बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) आहे. शिवाय, नौदलाचा तळही उरणमधील मोराजवळ आहे. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पेोरेशनचा (ONGC) प्लांटही उरणमध्ये असून, जिथे पेट्रोल साठा आहे. त्यामुळे हा भाग आणखी संवेदनशील म्हणून ओळखला जातो. GTPS-MSEB चा आशियातील पहिला नैसर्गिक गॅस प्रकल्प उरणमध्येच आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने पिरवाडी बीचही आहे, जिथे कायम पर्यटकांची वर्दळ असते. शिवाय, दिघोडे गावाजवळ रणसई धरणावरही पर्यटकांची गर्दी असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement