एक्स्प्लोर

मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाची वाट का पाहता? : कोर्ट

इंदापूर ते चिपळूण या पट्ट्यात सध्या खड्डे असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. निशा मेहरा यांनी दिली. त्यावेळी हायकोर्टाने झापत राज्य सरकारला याबाबत जाब विचारला.

मुंबई : मुंबई गोवा हायवेवरील खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी गणेश चतुर्थीचीच वाट का पाहता? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी गणेश चतुर्थीपर्यंतचा अवधी लागेल अशी माहिती राज्यसरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. यावरुन हायकोर्टाने संताप व्यक्त करत राज्यसरकारला धारेवर धरले. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाताहत झाली असून खड्डे चुकवत सध्या वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत. कंत्राट दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या कामावर देखरेख करण्याचे काम कोणाचे? अशी विचारणाही सरकारला  केली. परंतु सरकारला त्याचे उत्तर देता आले नाही. यावर हायकोर्टाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत ३० जुलैपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली. मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून पनवेल ते दोडामार्गपर्यंत या संपूर्ण महामार्गाची पुरती वाताहत झाली आहे. नव्यानं चौपदरीकरण करण्यात आलेल्या महामार्गाचीही तिच परिस्थीती असून प्रवाशांना दररोज खड्डयांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात अ‍ॅड. ओवीस पेचकर यांनी याचिका दाखल केली असून यावर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी इंदापूर ते चिपळूण या पट्ट्यात सध्या खड्डे असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. निशा मेहरा यांनी दिली. त्यावेळी हायकोर्टाने झापत राज्य सरकारला याबाबत जाब विचारला. आमदार अनिकेत तटकरेंकडूनही अधिवेशनात मुद्दा उपस्थित! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही आवाज उठवला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि पुलांच्या दुरुस्तीचे काम 15 ऑगस्टपर्यंत करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित प्रशासनाला दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली होती. “मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय झाले आहे. गणेशोत्सव जवळ येत आहे. रस्ता खराब झाल्याने लोकांना त्रासदायक ठरत आहे, असे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले. त्यानंतर अनिकेत तटकरे यांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ पुढील काम सध्याच्या कंत्राटदाराऐवजी नवीन कंत्राटदार नेमला जाईल. मे 2020 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गवरील ब्रीजचे काम केले जाईल.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget