एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 9 जूलै 2019 | मंगळवार
महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
1. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची अवस्था बिकट, पावसाने खेळ थांबला तोपर्यंत न्यूझीलंडच्या 46.1 षटकात 5 बाद 211 धावा
https://bit.ly/2XCaQTu
2. पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती, पण ते शरद पवारांचे नातेवाईक असल्याने कुणी दखल घेतली नाही, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची सीबीआय कोर्टात साक्ष
https://bit.ly/2XT4zlK
3. खासगी नोकऱ्यांमध्ये भूमीपुत्रांना 70 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मध्यप्रदेश सरकार घेणार, मुख्यमंत्री कमलनाथ यांची विधानसभेत माहिती, अशा प्रकारे आरक्षण देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य असणार
https://bit.ly/2Lc2VWA
4. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार, तर लोकं सोनिया गांधींना भेटतात आम्ही विठ्ठलाला भेटू असं म्हणत संजय राऊत यांच्याकडून पंढरपूर दौऱ्यावर शिक्कामोर्तब
https://bit.ly/2G6Blpw
5. बेस्टच्या भाडेकपातीच्या पहिल्याच दिवशी भरभरुन प्रतिसाद, पहिल्या टप्प्याचं भाडं केवळ पाच रुपये केल्यानं मुंबईकरांना दिलासा
https://bit.ly/2xEOaCE
6. नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक बनला छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर, छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केलेल्या नक्षलवाद्यांच्या यादीत नाव आल्यानं धक्कादायक माहिती समोर
https://bit.ly/2LcCakK
7. नवनीत कौर राणा, इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील 48 पैकी 15 खासदारांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान, लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी
https://bit.ly/30iSofw
8.नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा अखेर संपली, 15 ऑगस्टला दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार
https://bit.ly/2XDcj7k
9. दारु प्यायलात तर गाडीचं इंजिनच सुरु होणार नाही असं अनोखं तंत्रज्ञान भारतात आणण्याचा नितीन गडकरींचा विचार, राज्यसभेत बोलताना माहिती
https://bit.ly/2XU56Ur
10. मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोप खंडातील सर्वात उंच माऊंट एलब्रुस पर्वत, निद्रिस्त ज्वालामुखी असलेला हा पर्वत सर केल्यानं सर्वांचं कौतुक
https://bit.ly/32gbeWl
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement