Beed News Update : युक्रेनहून घरी परतलेल्या मुलाचे फटाके वाजवून स्वागत, बीडच्या माजलगावचा नौद परतला मायदेशी
Ukraine Russia War : मेडिकलच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला बीडमधील माजलगांव येथील नौद अनिलकुमार हा विद्यार्थी गावी परतल्यानंतर त्याचे फटोके फोडून स्वागत करण्यात आले.
Beed News Update : मेडिकलच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला बीडमधील माजलगांव येथील नौद अनिलकुमार हा विद्यार्थी आज आपल्य गावी परतला. नौद गावी परतल्यानंतर गावात फटाके फोडून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी आपला मुलगा सुखरूप परतल्याने कुटुंबीयांचे डोळे पाणावले होते.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनधील परिस्थिती बिटक होत आहे. त्यातच शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांत मात्र चिंतेचे वातावरण आहे. भारत सरकारकडून या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनहून मायदेशी परतले आहेत. बीडमधील माजलगाव येथील तेजपाल चैधरी यांचा मुगला नौद हा पण आज सकाळी सुखरूप आपल्या घरी परतला. नौद घरी परतल्यानंतर त्याला पाहताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. सुखरूप घरी परतणाऱ्या नौदचे कुटुंबीयांनी फटाके फोडून स्वागत केले.
माजलगांव येथील तेजपाल चैधरी हे व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांचा मुलगा नौद अनिलकुमार हा युक्रेन मधील विनित्सा शहरातील विनित्सा मेडिकल युनिवर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. त्याच्या वैद्यकिय शिक्षणाचे अजून एक वर्ष शिल्लक राहिले आहे. परंतु, रशिया अणि युक्रेनमधील युद्धामुळे त्याला भारतात परत यावे लागले आहे.
दोन्ही देशात युध्द सुरु झाल्यानंतर कुटुंबीयांनी नौदसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोन उचलत नव्हता. शिवाय मेसेजलाही उत्तर येत नव्हते. त्यामुळे त्याचे कुटुंबीय पुरते हादरुन गेले होते. काही तासानंतर नौद याने वडिलांना फोन केला आणि आपण लवकरच भारतात परतणार असल्याचे सांगितले. अखेर आज सकाळी तो घरी परतला.
मायदेशी परत येण्यासाठी 17 तास उपाशी राहिला नौद
हंगेरीच्या सीमेवर आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तब्बल 17 तासानंतर भारतीय दुतासाकडे नौद पोहोचला. परंतु, तेवढा वेळ तो उपाशी होता.
महत्वाच्या बातम्या
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Beed : एकाच छताखाली राहतो, पण एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही ; योगेश क्षीरसागरांची टिप्पणी
- Beed: भारतभुषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागराना अंतरिम जामीन मंजूर, रविंद्र क्षीरसागरांच्या अटकपूर्व जामिनावर 5 मार्चला सुनावणी
- बीडमधील क्षीरसागर काका-पुतण्या वाद पोलीस स्टेशनमध्ये, एकमेकांविरोधात गुन्हे दाखल