Weather Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! मोठ्या ब्रेकनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुण्यातलं वातावरण कसं असेल?
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. मोठ्या ब्रेकनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे.
पुणे : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Weather Update) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. मोठ्या ब्रेकनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावासाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
पुढील दोन दिवसांत कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहून अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील काही दिवस पुण्यात वातावरण कसं असेल?
13 सप्टेंबर - आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
14 सप्टेंबर - आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
15 सप्टेंबर - आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
16 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
17 सप्टेंबर - आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
18 सप्टेंबर - आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे विभागातील धरणांत 77.83 टक्के पाणीसाठा
मागील काही दिवस पुण्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पावसाने ब्रेक घेतला. या पावसामुळे शहरातील पाण्याची समस्या मिटली आहे कारण धरण पातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे विभागातील धरणांत 77.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये एकूण 317.72 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
या विभागात एकूण 38 धरणे असून, या सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही 408.22 टीएमसी इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील मुठा खोऱ्यांतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही 29.15 टीएमसी इतकी असून, आजअखेर या चार धरणांमध्ये 27.42टीएमसी पाणी साठले आहे
प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारी):
वरसगाव: 99.55टक्के
पानशेत: 100टक्के
खडकवासला: 53.12टक्के
पवना: 100टक्के
उजनी: 22.60टक्के
कोयना: 82.51टक्के
इतर महत्वाची बातम्या-