(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्यांनो सावधान! पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्टवर, सोशल मीडियावर अफवा पसरवल्यास कडक कारवाई होणार
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्टवर आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत झालेल्या दंगलीच्या (Pune Police) पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्टवर आले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहर आणि जिल्हाभरात वाढवण्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं पोलिसांनी पुणेकरांना आवाहन केलं आहे. सोशल मीडियावरुन पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तणतणाव वाढला होता. याच कारणमुळे सोशल मीडियावरून अफवा पसरवल्यास पुणे पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवायला सुरुवात केली आहे. आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सरसावले आहेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याच्यासाठी पुणे पोलीस अलर्टवर असल्याचं दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने रविवारी जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी या प्रकरणात 100 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केले आहेत.
इन्स्टाग्राम पोस्टवरुन वाद
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी आणि चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावस पांगवले होते. यावेळी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. सदर मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून दोघांचा मृत्यू झाला.
सोशल मीडियाचा वापर नीट करा...
सध्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन अनेक वाद निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही पोस्टमुळे नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन पुण पोलिसांनी केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नव्या संसद इमारतीवर फडकणार तिरंगा, जोरदार तयारी सुरू