एक्स्प्लोर
Advertisement
घराबाहेर पडण्याआधी पावसाचा अंदाज घ्या ! येत्या 4 दिवसांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानूसार राज्यातील पुढचे 4 दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत.
मुंबई : मुंबईसह संपुर्ण महाराष्टात पुढच्या चार दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावासाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या पावसासंदर्भात ही माहिती दिली आहे.
रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. आज दिवसभर मुंबईत पाऊस सुरुच होता. पुढचे चार दिवस म्हणजे 5 जुलैपर्यंत मुंबई-कोकणसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच विदर्भात देखील पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि अलिबाग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
जोरदार पावसामुळे किनारपट्टीलगतच्या नागरिकांना सावधानतेचाही इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार राज्यातील पुढचे 4 दिवस जोरदार पावसाचे असणार आहेत.
मुंबईत पाऊस पडला, महापौरांनी नाही पाहिला!
पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईतील दादर, हिंदमाता, परेल, सायन यासारख्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यातच सकाळपासून लोकल वाहतुकीवरही परिणाम झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला.
नियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतही काही भागात पाणी साचलं. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने खारघरच्या सेक्टर 10 मधील काही रस्त्यांना तलावाचं रुप आलं होतं. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या सीबीडी बेलापूरच्या कोकणभवनलाही पावसाचा तडाखा बसला.
"सेना-भाजप नाल्यातून पैसे खाते, मुंबई पाण्याखाली जाते!", जितेंद्र आव्हाडांची कविता | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement