एक्स्प्लोर
लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये आता गडकरींचा पुतळा!
नागपूर : लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळाही ठेवण्यात येणार आहे. हा पुतळा सध्या नागपुरातील गडकरी वाड्यात ठेवण्यात आला आहे.
आता वॅक्स स्टॅच्युच्या सेलेब्रिटी रांगेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही बसणार आहेत. सुनील कुडालू यांनी या गडकरींच्या पुतळ्याची निर्मिती केली आहे.
सुनील कुडालू यांनी बनवलेल्या गडकारींच्या वॅक्स स्टॅच्युचं अनावरण स्वत: नितीन गडकरींच्याच हस्ते करण्यात आलं. अगदी गडकरी यांचे स्मित, तीच बसण्याची पद्धत... नागपुरातील गडकरी वाड्यात गडकरींचा वॅक्स स्टॅच्यु पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती.
राजकुमार बडोलेंकडून पुतळ्याला शुभेच्छा
नितीन गडकरींचा पुतळा एवढा हुबेहूब आहे की, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या पुतळ्यालाच शुभेच्छा दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement