एक्स्प्लोर
पंढरपुरात जलसंकट , सोमवारपासून पाणीकपात लागू
उजनी धरण भरले असले तरी पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात केवळ 15 दिवस पुरेल एवढेच पाणी उरले आहे. त्यामुळेच नगरपालिकेने सोमवारपासून हि पाणीकपात लागू केल्याचे जाहीर केलं.

पंढरपूर : ऐन पावसाळ्यात निसर्गाने पाठ फिरवल्यानंतर आता परतीच्या पावसाची अाशा देखील मावळली आहे. खेड्यापाड्यासह शहरी भागातही दुष्काळाचे चटके जाणवू लागले. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पंढरपूर शहरावर जलसंकट आलं आहे. पंढरपूर शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आता कपात केली जाणार आहे. येत्या सोमवारपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. उजनी धरण भरले असले तरी पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात केवळ 15 दिवस पुरेल एवढेच पाणी उरले आहे. त्यामुळेच नगरपालिकेने सोमवारपासून हि पाणीकपात लागू केल्याचे जाहीर केलं. या पाणीकपातीमुळे नागरिकांसोबत पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या अडचणीतही भर पडणार आहे. सध्या चंद्रभागा देखील कोरडी पडली असून भाविकांना पाय धुवायलाही पाणी शिल्लक उरलेले नाही. यातच चंद्रभागा बंधाऱ्यातले पाणी देखील झपाट्याने कमी होऊ लागल्याने शहरावर हे जलसंकट ओढवले आहे. चंद्रभागा बंधाऱ्यातून शेतीसाठी होणार चोरटा पाणी उपसा तातडीने न थांबल्यास आठवडाभरात यापेक्षाही भीषण परिस्थिती शहरावर ओढवू शकते. उजनी धरणातून तातडीने चंद्रभागेत सोडण्याची मागणी देखील पंढरपुरातील नागरिकांकडून होत आहे .
आणखी वाचा























