एक्स्प्लोर

परळी बाजार समितीसाठी मतदान, मुंडे बहिण-भाऊ आमनेसामने

बीड : परळी कृषी उत्पन्न बाजार समितिच्या निवडणुकांसाठी 8 केंद्रांवर मतदानाला होत आहे. या निवडणुकीसाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी 1 हजार 900 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. पराभव टाळण्यासाठी पंकंजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आपापले मतदार सहलीला पाठवल्याचा गंभीर आरोप होत आहे. सहलीला पाठवलेले मतदार सकाळीच परळीत दाखल झाले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला. आता गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा हयात नाहीत. त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले आहे, तर धनंजय यांनी आपल्या पॅनलला पंडितअण्णा यांचे नाव दिले आहे. परळी नगरपालिका ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंचा मोठा पराभव धनंजय मुंडेंनी केला होता. परळी बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपसोबत संघर्ष करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी करुन ही निवडणूक लढत आहेत. धनंजय मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळात ही बाजार समिती नफ्यात आणल्याचा दावा राष्ट्रवादी करते आहे, तर केवळ पराभवाच्या भीतीपोटी पंकजा मुंडेंनी मतदारांना सहलीवर पाठवल्याचा आरोप राष्ट्रवादी करते आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत परळीत पंकजा मुंडेंना एकही जागा जिंकता आली नव्हती, तरीही राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांना फोडून तडजोडीच्या राजकारणातून जिल्हा परिषद ताब्यात आणली.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
Embed widget