एक्स्प्लोर
योग्य वेळी योग्य शस्त्र वापरु : विश्वास नांगरे-पाटील

पुणे : पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याबाबत कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "पोलिसांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिसांच्या बोधवाक्यातील 'खलनिग्रहणाय'प्रमाणे आम्ही योग्य वेळी योग्य शस्त्र वापरु", असा इशारा विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. तळेगाव एमआयडीसी येथे औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि उपाययोजनेसाठी आयोजित उद्योजकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान यावेळी नांगरे-पाटील यांनी 100 हा हेल्पलाईन नंबर ग्रामीण भागासाठी तात्काळ मदत पोहचविणारा ठरत नसल्याची खंत व्यक्त केली. तसंच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हैदोस घालणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील 500 गुंडांना निवडणुकीपूर्वी तडीपार करणार असल्याचंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























