एक्स्प्लोर

Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावरील 63 गतिरोधकांनी ग्रामस्थ त्रस्त

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर लावण्यात आलेले 63 स्पीडब्रेकरमुळे 15 गावांतील ग्रामस्थ आणि ताडोबा प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. रविवारी सर्पदंशाने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, परंतु स्पीडब्रेकरमुळे चंद्रपूरच्या दवाखान्यात उपचारासाठी न्यायला उशीर झाला आणि मुलगा दगावला, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या 15 गावांतील ग्रामस्थांमध्ये आणि ताडोबा प्रशासनामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचं कारण आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर लावण्यात आलेले 63 स्पीडब्रेकर. स्पीडब्रेकरमुळे ग्रामस्थांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या मुधोली गावातील या मुलाचा रविवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. मात्र स्थानिक गावकऱ्यांच्या मते, ताडोबा प्रशासनानं चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर लावलेल्या स्पीडब्रेकरमुळे या मुलाला चंद्रपूरच्या दवाखान्यात उपचारासाठी न्यायला उशीर झाला आणि त्यामुळेच हा 15 वर्षीय मुलगा दगावला. यानंतर ग्रामस्थांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला. वनविभागाच्या कार्यालयासमोर मुलाचा मृतदेह ठेवून स्थानिक गावकऱ्यांनी वनविभागाविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर घनदाट जंगल आहे आणि या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र अतिशय वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे गेल्या काही महिन्यात अनेक वन्यजीव या मार्गावर मृत्युमुखी पडले असून अनेक प्राणी गंभीर जखमीही झाले आहेत. गेल्या काही महिन्यात वाहनांच्या धडकेत या मार्गावर एक सांभर, एक चितळ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. तर ताडोबातील प्रसिध्द असलेला खली या वाघाला मोठी दुखापत झाली. त्यामुळे ताडोबा प्रशासनाने या 19 किलोमीटरच्या मार्गावर तब्बल 63 स्पीड ब्रेकर लावून वाहनांची गती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ताडोबा प्रशासनाचा हा निर्णय स्थानिक गावकऱ्यांच्या जीवाशी आला आहे.

ग्रामस्थ एकीकडे स्पीडब्रेकर विरोधात आक्रमक होत असतांना वनविभाग मात्र या सर्व सबबी चुकीचं असल्याचं सांगत आहेत. वाहनांच्या अतिवेगामुळे वन्यजीवांच्या मृत्यूसंख्येत वाढ होत असल्यामुळे आणि हा वनरस्ता आहे त्यामुळे हे करण्यात आल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे.

स्पीडब्रेकर्सला विरोध करणारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ही 22 गावं शिक्षण, आरोग्य, रोजगार यासारख्या सर्वच महत्वाच्या गरजांसाठी चंद्रपूर शहरावर अवलंबून आहेत. अतिशय घनदाट जंगलात असलेली ही गावं प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी चंद्रपूर गाठतात. याशिवाय ताडोबा परिसरात असलेले हॉटेल-रिसॉर्ट यांना देखील प्रत्येक लहान-मोठ्या कामांसाठी याच मार्गाने चंद्रपूर गाठावे लागते. त्यामुळे वनविभाग आणि ग्रामस्थांमध्ये गतिरोधकामुळे निर्माण झालेला हा गतिरोध तातडीने दूर करणे आवश्यक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget