Weather Update : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पूर्व विदर्भात मात्र पावसाची हुलकावणी; शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
Vidarbha Weather Update : नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने विदर्भाला सातत्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.
Vidarbha Weather Update : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. कुठं मुसळधार पाऊस होत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर गेल्या दोन आठवड्या पासून हवामान विभागाने सातत्याने विदर्भला यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अशातच पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे अद्याप कोरडेच राहीले आहेत. दरम्यान हवामान विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना रोज येलो अलर्ट दिला जातो मात्र पूर्व विदर्भात पावसाचा अद्याप पत्ताच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेते वाढ झाली असून अनेक ठिकाणी शेतीची कामे रखडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा जीव आता टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
यलो अलर्ट जारी करुनही पावसाचा पत्ता नाही!
नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पूढील काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या या अंदाजानंतर तरी पाऊस येईल का, याची शंका शेतकऱ्यांना यायला लागली आहेत. त्यामागील कारण म्हणजे गेल्या दोन आठवड्यापासून हवामान विभागाने (IMD) विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना सातत्याने यलो अलर्ट दिला आहे. मात्र या अंदाजानुसार अद्याप तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेले नाही. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस जारी करण्यात आलेल्या यलो अलर्टनुसार पाऊस पडेल का, याचीवाट बळीराजा बघतो आहे.
पावसामुळे अनेक जिल्ह्यात पोलिस भरती पुढे ढकलली
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र अनेक जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी लागली किंवा पुढे ढकलण्यात आली. तर कुठे नियोजित कार्यक्रमाही बदलावा लागला आहे, मात्र बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीचे नियोजित वेळेनुसारच पोलीस भरती सुरू आहे. याचं कारणही तसच आहे. बुलढाण्यातही गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. मात्र पोलीस अधीक्षकांच्या योग्य नियोजनामुळे पोलीस भरतीत कुठलाही खंड पडलेला नाही.
पोलीस अधीक्षकांनी सुरुवातीपासूनच या भरतीचे योग्य नियोजन केलं होतं. त्यामुळे पाऊस आला तरी रात्री पोलीस भरतीचे संपूर्ण ग्राउंड हे ताडपत्रीने झाकल्या जात आहे. त्यामुळे पाऊस आला तरी ग्राउंड ओल होत नाही किंवा चिखल होत नाही आणि त्याचमुळे पोलीस भरती प्रक्रिया बुलढाण्यात नियोजित वेळेनुसार सुरू आहे. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये ही यामुळे उत्साह आहे.
इतर महत्वाच्या बातम्या