एक्स्प्लोर

सावधान! आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मान्सून (Monsoon) सक्रिय होत आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह (Konkan) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात बदल (Climate change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विविध भागात जोरदार पाऊस कोसळत (Heavy Rain) आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मान्सून (Monsoon) सक्रिय होत आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह (Konkan) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आज काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात अतिृष्टीचा इशारा

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. मुंबईच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात पावसाचा जोर अधिक आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कुठे तरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल

दरम्यान, राज्यात सर्वत्र मान्सनू दाखल झाला आहे. विदर्भाच्या काही भागात मान्सून दाखल झाला नव्हता. मात्र, हवामान खात्याकडून (IMD) नागपूरसह पूर्व विदर्भात (Monsoon in East Vidarbha)  मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली आहे. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 16 जून होती. मात्र, 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झाला आहे.  केरळनंतर मान्सून कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात यापूर्वीच दाखल झाला होता. आता विदर्भातही मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं शेतीकामांना देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली आहे.  

महत्वाच्या बातम्या:

अखेर मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल, यंदा 5 दिवस विलंब, हवामान खात्याची माहिती

 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Narendra Modi: 'मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय', पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, 'काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले...'
'मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय', पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, 'काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले...'
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget