एक्स्प्लोर

छत्री, रेनकोट, ताडपत्री व्यावसायिकांना दिलासा, अत्यावश्यक सेवेच्या यादीत समावेश

व्यापारी वर्गाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्रांकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असताना अत्यावश्यक सेवेत छत्री, रेनकोट आणि ताडपत्री व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्याआधी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा सीजन फक्त दोन ते तीनच महिनेच असतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समावेश करत दिलासा देण्यात आला आहे. भिवंडी आणि परिसरात व्यापाऱ्यांचे कारखाने सुरु आहेत. उत्पादन होत असताना माल विकायचा कुठे असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला होता. आज व्यापारी वर्गाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रांकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. व्यापारी वर्ग, कामगार वर्गाकडून राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. 

मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांचेही पोट मुंबईतील छत्री बाजारावर भरत असते. या बाजारात जवळपास 400 दुकाने आहेत. ह्यातील काही दुकानांमध्ये छत्री, रेनकोटचा ठोक माल विकल्या जातो. ज्यात हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात तीन ते चार महिनेच होत असतो. त्यामुळे जर आता पुन्हा यावर्षी लॉकडाऊनची झळ व्यापाऱ्यांना बसली असती तर मोठं नुकसान झालं असतं असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे व्यावसायाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. 

कोरोनापासून बचावात्मक उपाय म्हणून छत्रीचा वापर होऊ शकेल : व्यापारी

व्यापाऱ्यांकडून मास्कसोबतच छत्र्यादेखील ठेवणं बंधनकारक करावं अशी मागणी करण्यात आली आहे. ज्यात पावसाळ्यात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचायचं असेल तर छत्र्यांच्या वापर करायला हवा. सोबतच नागरिकांकडून छत्रांचा वापर झाला तर सोशल डिस्टन्सिंग तसंच मेनटेन होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छत्र्या आम्ही ना नफा, ना तोटा तत्वावर देण्यास तयार असल्याचं दिनेश लुनिया यांनी सांगितलं. पावसापासून जसं बचावात्मक उपायसाठी आपण छत्र्यांचा वापर करतो तसंच कोरोनाला रोखण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो अशी कल्पना व्यापाऱ्यांकडून सुचवण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल; 1758 पानांच्या आरोपपत्रात नेमकं काय?Top 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 28 Feb 2025 | 4 PMABP Majha Marathi News Headlines  4PM TOP Headlines 4pm 28 February 2025Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Prakash Ambedkar : योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
Embed widget