एक्स्प्लोर
कोपर्डी बलात्कार शिवरायांच्या स्वराज्याला काळीमा : उदयनराजे

नाशिक : मराठा मूक मोर्चासाठी नाशिकमध्ये हजेरी लावलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी हल्लाबोल केला. कोपर्डीतील बलात्कार ही छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याला काळीमा आहे. त्या नराधमांना जाहीर फाशी द्या. अशा नराधमांना लोकांसमोर गोळ्या घालायला हव्या, असं उदयनराजे म्हणाले. तसंच मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, असं त्यांनी नमूद केलं. नाशिकमध्ये मराठा समाजाच्या विराट मोर्चाचा समारोप झाला.या मोर्चात सहभागी झालेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी या मोर्चानंतर पत्रकार परिषद घेतली. कोपर्डी बलात्काऱ्यांना गोळ्या घाला कोपर्डी बलात्कारातील गुन्हेगारांना जाहीर फाशी द्या, त्यांना लोकांसमोर गोळ्या घालून ठार मारा, असा घणाघात उदयनराजेंनी केला. त्वरित न्याय देणे देशाच्या हिताचं आहे. न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारांवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, असं उदयनराजे म्हणाले. सामाजिक समतोलासाठी कायद्यात बदल करा सामाजिक समतोल टिकायचा असेल तर कायद्यात बदल करा, अशी मागणी यावेळी उदयनराजेंनी केली. मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिति होऊ देऊ नका. पक्षपेक्षा देशाचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला. मराठा ही जात नाही जगण्याची संस्कृती मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मराठा सोडून सर्वांना आरक्षण देतात. कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण द्या. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे, असं उदयनराजे म्हणाले. जाती-जातींचे मोर्चे निघताय, पण ही काय स्पर्धा लागली आहे का?? असा सवाल त्यांनी केला. आरक्षण असल्याने भारतातले संशोधक अमेरिकेत गेले. राज्यकर्त्यांनी जाती तयार केल्या.नेते अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगला अभिनय करतात. सर्वाधिक कर्जांची परतफेड शेतकरी करतात, उद्योगपती कर्ज बुडवतात, अशा अनेक विषयांना उदयनराजेंनी हात घातला. उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे *पैशांचा गैरवापर करुन न्याययंत्रणा आणि पोलिस यंत्रणांना ताब्यात घेऊन चेष्टा केली जात आहे. *स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. *मेक इंडिया नाही ब्रेक इंडिया होतंय. *कायदा नव्हता तेव्हाही लोक जगत होते. *घटनेने दिलेला समानतेचा हक्क दया *आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धड़ा शिकवा... *आरक्षण, अट्रोसिटीवर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या *अन्यथा सरकार एकटे नाही 288 आमदार जबाबदार *मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी नक्षलवाद्यांच नेतृत्व करेन. *लोकशाही पेक्षा आमची राजेशाही बरी होती एबीपी माझा वेब टीम VIDEO:
आणखी वाचा























