किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाहीत; उदयनराजे यांचा केंद्राला सल्ला
लॉकडाऊन वाढवल्यावरुन सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यासह केंद्रावर टीका केली आहे. लॉकडाऊनमुळे लोकं उपाशी मरत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असा सल्ला उदयनराजे यांनी दिला आहे.
सातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी टीका केलीय. लॉकडाऊन कधी उठणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाही, किती दिवस अन्यधान्य पुरवणार? असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी केंद्राला दिलाय. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन चर्चा करुन लॉकडाऊन उठवण्याविषयी निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले.
लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? असा प्रश्न माजी खासदार उदयनराजे यांनी राज्यासह केंद्राला विचारला आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची त्यांच्या शैलित सडेतोड उत्तरे दिली.
कोरोना विषाणू संसर्गासाठी पर्याय आयुर्वेद आहे. होमियोपॅथीने कोणताही आजार बरा होता. मी यांचा प्रचार करत नाही. वस्तुस्थिती आहे ती सांगतोय. पूर्वीच्या काळात अॅलोपॅथी नव्हती, त्यावेळी झाडपाल्यांच्या औषधांचा वापर केला जात होता. जे गुणकारी आहेत. दरम्यान, स्विडीन देशाने ज्या प्रमाणे हर्ड इम्युनिटीचा प्रयोग केला. तसाच प्रयोग आपण भारतात केला पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.
मुंबईत 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू! जमावबंदीसह नाईट कर्फ्यू
हा कोरोना किती काळ टीकणार? हे कोणीही सांगू शकत नाही. संपुर्ण देशभरातली लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संदर्भात दक्षता घेण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण आपली काळजी घेतली तर आपोआप कुटुंबही सुरक्षित राहणार आहे. ज्याप्रमाणे सज्ञान झाल्यावर मतदानाचा हक्क असतो तसं सज्ञान झाल्यावर स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण ही तुमची जबाबदारी आहे.
पंतप्रधान मोदी यांना सल्ला
लॉकडाऊन किती दिवस ठेवणार, यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. लॉकडाऊन काढला नाही तर आता लोक गप्प बसणार नाहीत. त्यांच्या घरातच अन्नधान्य नसेल, हाताला कामच नसेल तर त्यांनी जगायचं कसं, आगोदरच कोरोनामुळे जगात वातावरण विस्कळीत झालं आहे. आर्थिक परिस्थिती पाहिली तर चोऱ्या-माऱ्या लुटमार सुरू होईल, ते काही स्वखुशीने नाही तर पर्याय नसल्याने घडेल. ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे पोलिसांची कुवत पुरेशी नाहीय. जे कोणी सत्तेत असतील त्या प्रमुख मंडळींनी एकत्र बसुन यावर तात्काळ तोडगा काढावा. लोक ऐकणार नाहीत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेत उदयनराजे यांनी दिला. परिणामी लॉकडाऊन तुम्हाला उठवावाच लागणार आहे. धान्य पुरवताय हे ठिक आहे, पण किती काळ पुरवणार? देशाची लोकसंख्या काही थोडी नाही. केंद्र आणि राज्ये यांनी एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे. हे मी बोलत नाही तर जनता बोलते, लोक म्हणतात आम्ही गप्प बसणार नाही.
आमीर खानच्या टीममधील 7 जणांना कोरोना; आईचा कोरोना अहवालही आला समोर
तर, लोक गप्प बसणार नाहीतजे पोलीस विनाकारण मारहाण करत आहेत, त्यांना थांबवावं, कारण लोकं पुढ ऐकणार नाहीत. प्रगत राज्य आहे, म्हणून लोक ऐकून घेतात, त्यांनीच जर तुमचं दांडकं हिस्कावून घेतलं आणि तुम्हाला मारलं तर तुम्ही कसं कंट्रोल करणार? त्यांचा संयम सुटला तर ते लोकप्रतिनीधींचेही ऐकणार नाहीत. ती वेळ येऊ नये.
कोणालाच माहिती नाही कोण कोणासोबत आहे
पडळकरांचं मला काहीच माहिती नाही. लोकशाहीत अशी एवढी अस्थिरता कधीच निर्माण झाली नव्हती. कोणालाच माहिती नाही कोण कोणासोबत आहे, लोकांनाच माहिती नाही, सत्तेत कोणीही असूनद्यात, चांगल्या कामाला माझा विरोध कधीच नसतो. आम्ही कोणतं प्रपोजल घेऊन आलो तर आम्हालाही चांगल्या कामाची अपेक्षा असते. विरोध होऊ नये. मी पक्ष स्थापन केलेला नाही, जे प्रमुख आहेत, पॉलिसी मेकर आहेत ते निर्णय घेतील. मी मेन नाही, कशाला मग लोकशाही आणली. राजेशाही असती तर तुम्हाला दाखवलं असतं कसं राज्य करायचं. लोकशाहीतले राजे ठरवतील, तुम्ही मान्य केलं तर आम्हीही मान्य करणार. त्यांनी चागंलं राज्य करावं, शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत असं राज्य ते कराव, जे कोणी सत्तेत आहे, त्यांनी.एवढीच जनतेच्या वतीने हात जोडून मी विनंती करतो, असं शेवटी उदयनराजे म्हणाले.
Udayanraje Bhosale | Lockdown कधी उठवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाही : उदयनराजे