आमीर खानच्या टीममधील 7 जणांना कोरोना; आईचा कोरोना अहवालही आला समोर
बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्याच्या टीममधील 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच त्याच्या आईचा कोरोना अहवालही समोर आला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या टीममधील 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. अशातच आमीर खानने आपल्या घरातील सर्वांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. त्या सर्वांच्या कोरोना चाचणीचे अहवाल नेगेटिव्ह आले होते. मात्र, आमीरच्या आईची कोरोना चाचणी करणं बाकी होतं. आमीरने आपल्या आईचीही कोरोना चाचणी केली असून त्याच्या आईच्या चाचणीचा अहवाल समोर आला आहे. आमीर खानच्या आईचा कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे.
मंगळवारी समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेता आमीर खानच्या टीममधील 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, आमीर खानच्या टीममधील 7 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये आमीर खानचा एक ड्रायव्हर, दोन सुरक्षा रक्षक आणि त्याच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. अशातच या 7 जणांना लगेच क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी पाऊल उचलत त्यांना लगेच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हलवलं होतं. त्यानंतर आमीर खानच्या कुटुंबातील सर्वांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्या सर्वांच्या कोरोना टेस्टचे अहवाल नेगेटिव्ह आले होते. परंतु, आमीर आपल्या आईच्या अहवालाबाबत चिंतेत होता.
आमीर खानने आज एक ट्वीट करत सांगितले की, 'मी सध्या चिंतामुक्त झालो आहे. माझ्या आईचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी खूप आभार!
आमीर खानने काल एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले होते की, 'माझ्या स्टाफमधील काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांना लगेच क्वॉरंटाईन करण्यात आलं. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी पाऊल उचलत त्यांना लगेच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये हवण्यात आलं. मी बीएमसीचे आभार मानतो की, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. एवढचं नाहीतर त्यानंतर बीएमसीच्या वतीने संपूर्ण सोसायटी व्यवस्थित सॅनिटाइज करण्यात आली. आम्हा सर्वांच्याही टेस्ट करण्यात आल्या असून आम्हा सर्वांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या आहेत. सध्या मी माझ्या आईला कोरोना टेस्टसाठी घेऊन जात आहे. मी प्रार्थना करतो की, माझी आईचा रिपोर्टही नेगेटिव्ह येईल.'
दरम्यान, जर बॉलिवूडबाबत सांगायचे झाले तर कोरोनाच्या संसर्गामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 मे रोजी प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचा मृत्यू कोरोना आणि किडनी फेल्योरमुळे झाला होता. 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध निर्माते अनिल सूरी यांच्याही मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव; टीममधील 7 जण कोविड पॉझिटिव्ह
पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा
सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला; समोर आलं मृत्यूचं खरं कारण