Shahaji Bapu Patil : विधानपरिषदेवर घ्या म्हणणाऱ्या शहाजीबापू पाटील यांचा यु टर्न, शिवसेनेच्या टीकेनंतर म्हणाले...
Shahaji Bapu Patil On Vidhan Parishad : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil ) यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे. मला विधानपरिषदेवर पाठवा आणि अभिजीत पाटलांना विधानसभा लढू द्या असं म्हणणाऱ्या शहाजीबापू यांनी विधानसभा मीच लढवणार असे म्हटले आहे.
Shahaji Bapu Patil On Vidhan Parishad : शिवसेनेकडून सुरु झालेल्या बोचऱ्या टीकेनंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil ) यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे. मला विधानपरिषदेवर पाठवा आणि अभिजीत पाटलांना विधानसभा लढू द्या असं म्हणणाऱ्या शहाजीबापू यांनी आता विधानसभा मीच लढवणार असे म्हटले आहे. शिवसेनेच्या टीकेनंतर आपल्या वक्तव्यावरून खुलासा करण्याची शहाजीबापू यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.
मला विधानपरिषदेवर पाठवा असं वक्तव्य केल्यानंतर शहाजीबापू पाटील यांच्यावर सांगोल्यातील शिवसेना नेत्यांनी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेतून होत असलेल्या बोचऱ्या टीकेनंतर शहाजीबापू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगोला विधानसभा आपणच लढवणार असल्याचं शहाजीबापू यांनी स्पष्ट केलं आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभ सोहळ्यात बोलताना शहाजीबापू म्हणाले होते की, मला विधानपरिषदेवर पाठवा आणि अभिजित पाटील यांना सांगोला विधानसभा लढू द्या. शहाजीबापूंच्या या वक्तव्यावर शिवसेनेने त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. "शहाजीबापू यांनी पराभूत होण्याच्या भीतीने निवडणुकीतून पळ काढला. आता सर्व 40 आमदार असेच पळून जातील अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. शिवसेनेच्या या टीकेनंतर सांगोला विधानसभा आपणच लढवणार असून विजयी होणार असल्याचा दावा देखील शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
"विठ्ठलाच्या कार्यक्रमात आपला तरुण भाचा अभिजित पाटील याला आत्मविश्वास मिळावा यासाठी आपण ते वक्तव्य केले होते. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघात दिवंगत गणपतराव देशमुख यांचे कुटुंबीय विरुद्ध शहाजीबापू अशीच निवडणूक आजवर होत आली आहे आणि यावेळीही अशीच होणार असे शहाजीबापू यांनी स्पष्ट केले. आपल्या टोलेबाजीमुळे राज्यभर प्रसिद्धीस आलेले आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्याच एका जाहीर वक्तव्याने अडचणीत आले होते. आता त्यांना आपल्याच वक्तव्यावर खुलासा करण्याची वेळ आली आहे.
निवडणुकीच्या रणांगणातून शहाजीबापू पाटील यांनी पळ काढल्याची टीका
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे पार पडलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजन प्रसंगी शहाजीपाबू पाटील यांनी हे वक्तव्य केलं आणि ते भलतेच अडचणीत आले. 'काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे राज्यत चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला काय? अशी टीका विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्यानंतर केली जाऊ लागली होती.
काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील?
"पंढरपूरमधून परिचारक आहेत, मंगळवेढ्यातून समाधान आवताडे तर माढ्यामधून बबन दादा म्हणताहेत माझं पोरग पाठवतो. आपलं झाडी डोंगर असं फेमस झालंय की आपल्याला काय नांदेडमध्ये गेलं की गर्दी, कोकणात गेलं तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषदेवर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी मागणी भर सभेत आमदार पाटील यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या