आई जगदंबेच्या तुळजापुरात कोणी पोहोचवलं ड्रग्ज? पत्त्याच्या सवयीतून सुरू झाला विळखा, मुंबई कनेक्शन, वाचा A टू Z रिपोर्ट
ज्या शहराची सुरवात उदे गं अंबे उदेने म्हणत चरण तीर्थाने होते . संध्याकाळ प्रक्षाळ पूजेने होते .त्याच महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात 'दम मारो दम' चे आवाज ऐकू यायला सुरुवात झाली

Tuljapur Drug Case: तुळजापूर महाराष्ट्राच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ. पण गेल्या काही दिवसांपासून ते धार्मिक स्थळ चर्चेत आहे ते ड्रग्ज विक्री आणि ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईमुळे. या प्रकरणात नवनवे खुलासे झाले. पुजारीच पेडलर असल्याचे समोर आले. या प्रकरणात सर्वपक्षीय राजकीय कनेक्शनही समोर आल्यानंतर धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली. तुळजापूर प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं? तुळजापूरच्या पवित्र भूमीत कोणी पोहोचवले ड्रग्ज? धार्मिक स्थळ कोणी केलं अपवित्र? पाहुयात हा रिपोर्ट. (Tuljapur Drug)
ज्या शहराची सुरवात उदे गं अंबे उदेने म्हणत चरण तीर्थाने होते . संध्याकाळ प्रक्षाळ पूजेने होते .त्याच महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात 'दम मारो दम' चे आवाज ऐकू यायला सुरुवात झाली होती.कारण या शहरात मुंबई व्हाया तुळजापूर असा ड्रग्जचा बाजार मांडला जात होता. आता प्रश्न हा आहे की मुंबई पासून 467 किलोमीटरपर्यंत ड्रग्ज पोहोचलं कसं? याच शहरातील एका राजकारणाचा मुलगा, जो काही काळ मुंबईत वास्तवास होता. त्याला तिथं पत्ते खेळायची सवय लागली आणि सोबतच ड्रग्जचीही.सातत्याने मुंबईला येणं जाणं वाढलं आणि ड्रग्ज नकळत तुळजापुरात पोहोचलं. (Dharashiv)
पत्ते खेळायची सवय, ड्रग्जसाठी फॉर्च्यूनर वापरली
विनोद उर्फ पिंटू मुळे च्या माध्यमातून तुळजापुरात ड्रग्ज दाखल झाल्याची माहिती आहे. पिंटू मुळे काही काळ मुंबईत वास्तव्याला होता, या काळात पत्ते खेळायची त्याला सवय लागली. पत्त्यांच्या क्लबवरच वैभव गोळे आणि पिंटू मुळे यांची ओळख झाली. मुळगाव तुळजापूर असल्याने ये जा ही असायची, त्यात इतर लोकांच संपर्क वाढला. चंद्रकांत उर्फ बापू कन्या माजी नगराध्यक्षांच्या संपर्कात पिंटू मुळे आला. त्यांच्या संपर्कातील स्वराज तेलंग परमेश्वर गोठण कदम हे लोकही संपर्कात आले.
सुरुवातीच्या काळात वैभव गोळे पार्सलने तुळजापुरा डिलिव्हरी करायचा. मात्र त्यानंतर तुळजापुरातील ही मंडळी देखील मुंबईला ड्रग्ज आणण्यासाठी जाऊ लागल्याची माहिती आहे.त्यासाठी चंद्रकांत उर्फ बापू कनेची फॉरच्यूनर गाडी वापरात आल्याची ही माहिती आहे. ड्रग्ज वापरासाठी तीन ते चार वेळा ही गाडी वापरल्याने पोलिसांनी ती नुकतीच जप्त केल्याचीही माहिती समोर आली.
तुळजापुरातील तरुणाईला हेरलं, ड्रग्जचा सुळसुळाट
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तुळजापुरात सुरुवातीला ड्रग्स आणणाऱ्याचं नाव आहे पिंटू मुळे. कालांतराने मुंबईचा ड्रॅग विक्रेता तुळजापूरमध्ये पोहोचला आणि हळूहळू ड्रग्सचा हा जीवघेणा व्यापार तुळजापूर पोहोचला.कालांतराने आपल्याला ड्रग हवे म्हणून या नेत्याच्या मुलांना आपली काही कार्यकर्ते मुंबईला ड्रग्स जाणायला पाठवले. ते शंभर रुपयांचा ड्रग आणलं तर त्यातील 80 रुपयांचे ड्रसच या नेत्याच्या मुलाला पोचवायचे आणि उर्वरित वीस रुपयांचं यांनी तुळजापुरातील तरुणाईला हेरत विकायला सुरुवात केली.
ड्रग पाठवणारे प्रमुख तीन लोकांचे कनेक्शन
तुळजापुरात ड्रग्स पाठवणारे तीन प्रमुख लोक आहेत.संतोष खोत , वैभव गोळे आणि संगीता गोळे. संगीता गोळीच्या सांगण्यावरून संतोष खोत तुळजापुरातील मंडळींच्या संपर्कात होता.संगीता गोळेचे जवळपास पाच कोटींच्या ट्रांजेक्शन समोर आले आहे. तर संतोष खोतचे देखील एक ते दीड कोटीचे ट्रांजेक्शन असल्याची माहिती आहे. सुरुवातीला हॉटेलमधून मोजक्या लोकांनाच ड्रग मिळायचं.मात्र त्यानंतर हॉटेल,मोकळी मैदान, एखाद्या चौकात कुठेही या ड्रग्सची डिलिव्हरी व्हायला सुरवात झाली.एक ग्रॅम ड्रग्जची पुडी, दोन भागांमध्ये विभागून तुळजापुरात विक्री जायचे. एक ग्रामची किंमत ही 3000 रुपये एवढी होती. तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणात काही लोक विनाकारण अडकली गेली आहेत. अशा 80 पेक्षा अधिक लोकांना ड्रग्स विक्रेत्याशी पैशांचा व्यवहार झाल्यानं नोटीसा दिल्या गेल्यात. कसं तेही पहा.
काय काय समोर आलं?
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात एका आरोपीचं नाव आहे आबासाहेब पवार. आप्पासाहेबांचं तुळजापूर शहरात बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. लोकांनी मटेरियल खरेदी केल्यानंतर काही पैसे आरोपीने थेट ड्रग्ज पुरवठाधारांच्या खात्यावर ट्रान्सफर करायला लावले याची माहिती आहे. त्यामुळेच आता पोलिसांचा ससे मिरा त्यांच्या मागे लागला आहे.. ड्रग्स ट्रांजेक्शन मध्ये व्हाट्सअप चा वापरही मोठ्या प्रमाणात झाला.व्हाट्सअप कॉल च्या माध्यमातून ड्रग्जची ऑर्डर दिली जायची, कुठे घेणार हेही ठरलं जायचं.तुळजापूर ड्र्ग्ज प्रकरण एकूण 36 आरोपी, 14 जणांना आतापर्यंत अटक आणि 22 आरोपी अद्याप फरार आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी 10000 पानाचे चारशीट दाखल केले आहे. पण तुळजापूर सारख्या धार्मिक संस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरातली तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकली. आता तुळजापूर शहराचं नाव बदनाम करणाऱ्या अनेकांना वेड्यात ठोकल्यात तर अनेक जण फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कसून चौकशी करुन हे ड्रग्ज रॅकेट मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे.
हेही वाचा:






















