(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Transgender Wedding : बीडचा तरूण तृतीयपंथीयाशी बांधणार लग्नगाठ! सपना-बाळूची अनोखी प्रेमकहाणी
एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे.
Transgender Wedding : बीड (Beed) मधील एका तरुणाने अनोखा निर्णय घेतला आहे. एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे. मागील अडीच वर्षांपासून बीडमधील किन्नर सपना आणि बाळू लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.
सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी..
बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूच्या अनोखी प्रेम कहाणीची सुरूवात झाली
एक तृतीयपंथीय दुसऱ्या तृतीयपंथीय सोबत लग्न केल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. मात्र एका तृतीयपंथीय सोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय एका सर्वसामान्य मुलांना घेतलाय. बीडच्या माळापुरी गावचा बाळू तोडमल आणि बीड शहरात राहणारी सपना एखाद्या चित्रपटातील लवस्टोरीला देखील लाजवेल अशी या दोघांची प्रेम कहाणी आहे. तृतीयपंथी असलेली सपना आणि ढोलकी वाजवण्याच काम करणारा बाळू या दोघांची भेट एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात झाली. आणि इथूनच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली पहिल्याच भेटीत तृतीयपंथी असलेल्या सपना वर बाळूचा जीव जडला आणि त्याने थेट सपनाला लग्नाची मागणी घातली.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय
ज्या समाजाने कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही. तिथे लग्नाचा विचार करणं ही सपनाला स्वप्नवतच होतं. त्यामुळे पहिल्यांदा सपनाने बाळूला नकार दिला. तिने नकार दिल्यामुळे बाळूने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. हे सर्व कळल्यानंतर सपनाने बाळूच प्रेम पाहून लग्नासाठी होकार दिला. मात्र समाज आणि कुटुंबातील लोक आपल्याला स्वीकारतील का? हा प्रश्न दोघांसमोर होता. लग्नासाठी असंख्य अडचणी येतील हे त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी बीडमधील काही पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली आणि आता बीडच्या पत्रकारांच्या सहकार्यातून 8 मार्चला महिला दिना दिवशी या दोघांचा विवाह पार पडणार आहे.
समाजात आजही तृतीय पंथीयाना सन्मानाची वागणूक मिळत नाही. मात्र समाजातील रूढी परंपरेला झुगारून बाळूने सपनासोबत संसार थाठण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांनी विवाह केला होता. बीडमध्ये किन्नर सपना आणि बाळू आता वाजत-गाजत विवाह करणार आहेत. मराठवाड्यात बहुदा हा पहिलाच विवाह सोहळा असावा, मात्र या पूर्वी मनमाड मधल्या संजय खाडे याने किन्नर शिवलक्ष्मी सोबत विवाह केला होता. बाळू आणि सपना हे मागच्या अडीच वर्षापासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत. अडीच वर्षांमध्ये बाळूला अनेकांनी हिणवले. मात्र संसार मला करायचा आहे समाजाला नाही, असं म्हणून त्याने सपनावरचं प्रेम तसूभरही कमी होऊ दिले नाही.
बीड पत्रकार संघाच्या पुढाकाराने होणार विवाह सोहळा
किन्नर सपना आणि बाळूच्या या प्रेम प्रकरणाला बीड पत्रकार संघाने पुढाकारातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आणि पत्रकार शेख आयशा यांनी सपना आणि बाळूच्या विवाह संदर्भात विशेष प्रयत्न केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Nawab malik: नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी; सत्र न्यायालयाचा निर्णय
- Nawab Malik Arrested : मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ईडीची कारवाई, छगन भुजबळांचा आरोप
- Nawab Malik Arrest: 'मविआशी समोरासमोर लढता येत नसल्याने हे अफझलखानी वार सुरू आहेत,' खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha