एक्स्प्लोर

Nawab Malik Arrest: 'मविआशी समोरासमोर लढता येत नसल्याने हे अफझलखानी वार सुरू आहेत,' खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Nawab Malik Arrest: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आलं. मलिक यांच्या घरी बुधवारी सकाळच्या सुमारास ईडीने धडक दिली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली. दरम्यान मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या या कारवाईला 'अफझलखानी वार' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मलिकांची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादीने मलिकांनी कोणतंच चूकीचं काम केलं नसल्याने त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचं सांगितलं आहे. अशात सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात असून संजय राऊत यांनीही ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले. हेच हिंदुत्व आहे. जय महाराष्ट्र!' दरम्यान संजय राऊत यांनी या प्रतिक्रियेतून मलिकांचा राजीनामा घेऊ नका असं सांगितलं असून राष्ट्रवादीकडूनही मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Nagpur News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री अन् महसूल मंत्री बावनकुळेंचा मुक्काम! बळीराजाच्या घरी स्वयंपाकाला उशीर झाला अन्...., लोहारी सावंग्यात नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री अन् महसूल मंत्री बावनकुळेंचा मुक्काम! बळीराजाच्या घरी स्वयंपाकाला उशीर झाला अन्...., नागपूरच्या लोहारी सावंग्यात नेमकं काय घडलं?
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
Embed widget