Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 25 एप्रिल 2022 : सोमवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केलेल्या राणा दाम्पत्याची जेलमध्ये रवानगी, रवी राणांचा तळोजा तर नवनीत राणांचा भायखळा जेलमध्ये मुक्काम
Navneet Ravi Rana Vs Shiv Sena: मुंबई पोलिसांनी आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी यांना न्यायालयात हजर केले. या दोघांवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आता त्यांची तरुंगात रवानगी होणार आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आली. आताच मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. यानंतर आता त्यांची तुरुंगाच्या दिशेने रवानगी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर, नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात येऊ शकतं. तत्पूर्वी रवी राणा यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. आर्थर रोड तुरुंगात नवीन कैद्यांसाठी जागा शिलक्क नसल्याने त्यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
2. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांसह भाजपचं शिष्टमंडळ आज दिल्लीत गृहसचिवांना भेटणार, गृहमंत्री अमित शाहांची भेट मिळणार का याची उत्सुकता
3. 'भाजप नाच्या पोरांसारखा बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच'; शिवसेनेची सामनातून खरमरीत टीका
4. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत नियमावली ठरवण्यासाठी मुंबईत आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती
5. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, ओबीसी आरक्षणाबरोबरच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं भवितव्यही ठरणार
6. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी परशुराम घाट आजपासून महिनाभर बंद राहणार, वाहतूक लोटे कळंबस्ते मार्गानं वळवणार
7. राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, हिंगोलीत अवकाळीनं शेतकऱ्यांचं नुकसान
8. कोरोनाचे आकडे वाढत असल्यानं चिंता; कोविड परिस्थितीवर पंतप्रधान मोदी करणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा
9. इमॅन्युअल मॅक्रोन सलग दुसऱ्यांदा फ्रान्सचे राष्ट्रपती; विक्रमी मतांसह ऐतिहासिक विजय
10. मुंबईचा सलग आठवा पराभव, लखनौचा 36 धावांनी विजय, आज चेन्नई आणि पंजाबच्या 'किंग्स'मध्ये टक्कर