(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 23 एप्रिल 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. शिवसैनिकांच्या प्रचंड विरोधानंतरही राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावर ठाम, मातोश्रीबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्ताबरोबरच शिवसैनिकांचाही पहारा
Navneet Rana vs Shivsena : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे काल (शुक्रवार) पासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. नवनीत राणांनी दिलेल्या आव्हानानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
2. मोहित कम्बोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे मॉब लिंचिंगचा प्रकार, भाजप नेत्यांचा हल्लाबोल, तर कम्बोज यांनी रेकी केल्याचा शिवसेनेचा आरोप
3. लोडशेडिंगविरोधात भाजपचं आजपासून सलग 7 दिवस आंदोलन, टक्केवारीसाठी चढ्या दरानं वीजखरेदी करत असल्याचा सरकारवर आरोप
4. कोल्हापुरात संध्याकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा भव्य मेळावा, राज ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याची शक्यता
5. लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडी देवींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत नितीश कुमार यांची हजेरी, अमित शाहांच्या बिहार दौऱ्यापूर्वी झालेल्या गाठीभेटीमुळं चर्चांना उधाण
6. कोकणातील रिफायनरी विरोधकांची थेट आयपीएलच्या मैदानात घोषणाबाजी, वानखेडे स्टेडियमवर दिल्ली विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात रिफायनरी हटावचा नारा
7.देशात एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु, राज्यात लोकशाहीला मारक राजकारण, मंत्री अशोक चव्हाणांचं टिकास्त्र
8. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं सतर्कता; दिल्ली, पंजाबसह काही राज्यांमध्ये पुन्हा मास्क बंधनकारक
9. उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर, काही जण जखमी
10 . प्रशांत किशोर यांच्या रणनितीवर काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा, सोनिया गांधी यांच्यासमोर मांडल्या सूचना