एक्स्प्लोर
टोलवसुलीला पुन्हा सुरुवात, टोलनाक्यावर मोठ्या रांगा

मुंबई : राज्यासह देशभरात आजपासून पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाली आहे. नोटाबंदीनंतर सरकारने 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीची घोषणा केली होती. मात्र ही मुदत 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संपल्याने आज टोलनाक्यावर पुन्हा वसुलीला सुरुवात झाली आहे. वसुलीमुळे टोलनाक्यांवर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयांच्या वर टोल असल्यास 500 ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र टोल 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास सुट्टेच पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र यामध्ये काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोलनाक्यावर 15 डिसेंबरपर्यंत जुनी नोट देता येणार आहे.
टोल नाक्यांवर आता 5 ते 100 रुपयांपर्यंतची कुपन्स
पाच वेळा टोलमाफीच्या घोषणा 8 नोव्हेंबरनंतरच्या नोटबंदीनंतर 14, 18, 24 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरपर्यंत वेळोवेळी टोलमाफी देण्यात आली होती. टोलमाफीच्या घोषणा पहिली घोषणा – 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत दुसरी घोषणा – 11 ते 14 नोव्हेंबरपर्यंत तिसरी घोषणा – 14 ते 18 नोव्हेंबर चौथी घोषणा – 18 ते 24 नोव्हेंबर पाचवी घोषणा – 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016टोलवसुलीची कालमर्यादा वाढवण्याचा सरकारचा विचार
टोल नाक्यांवर 5 ते 100 रुपयांपर्यंतची कुपन्स 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल नाके सुरु होत आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी टोलची कुपन देण्याचा विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे सुरु आहे. 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतची ही कुपन्स असतील. त्यामुळे टोलचे पैसे देतानाही ही कुपन्स वापरता येतील, तसंच उरलेले सुट्टे पैसे म्हणूनही टोलधारक ही कुपन्स ग्राहकांना परत करतील.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























