(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मीरा- भाईंदरमध्ये दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कार
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठी नव्या उपक्रमाची आखणी, दर 15 दिवसांनी कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, 15 एप्रिलपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचेही आदेश
2. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा, घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी उद्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा
3. मुंबईकरांना आता घरातल्या कचऱ्यावरही कर द्यावा लागणार, रिअल इस्टेटचा व्यवसाय सुस्तावल्यानं पालिकेच्या तिजोरीला फटका, घटलेलं उत्पन्न भरुन काढण्याचा प्रयत्न
4. 100 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन, 3 महिन्यात निर्णय अपेक्षित, ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
5. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान, आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये प्रमुख लढत, अरविंद केजरीवालांसह दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार
6. हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करणार, पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता, विकेश नगराळेला कठोर शिक्षा देण्याची सर्व स्तरातून मागणी