(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Maharashtra CM: भाजप पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल, अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार होते तिथे 8 टक्के फेरफार झाल्याचे दिसत आहे.
पुणे: भाजपकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल. पंकजा मुंडे यांना भाजप मुख्यमंत्री करु शकेल. त्यांचा अनुभव आहे. त्या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांनादेखील संधी मिळु शकेल, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धोक्याची जाणीव झाली आहे, त्यामुळे ते गृहमंत्री पद मागत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवले पाहिजे. मात्र, भाजपच ते ठरवताना दिसते आहे. भाजपला फॉर असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना मंत्रिपद मिळेल, असेही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला. आपल्या पक्षात कोण मंत्री व्हावं ते ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाचा असतो. मात्र, या ठिकाणी सगळं काही भाजपचे दिल्लीतले नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शत प्रतिशत भाजपच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 88.06 टक्के आहे. तर महायुतीचा एकत्रित स्ट्राईक रेट 81 टक्के राहिला आहे. लोकसभेला 30 टक्यांच्या आसपास होता. भाजपने 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील 95 निवडून आले. लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच लाभ या निवडणुकीत भाजपला झाला. भाजपचे उमेदवार होते तिथे 10 टक्यांचा लाभ ईव्हीएम मध्ये फेरफार करुन झाला असल्याचे दिसते. तर, अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार होते तिथे 8 टक्के फेरफार झाल्याचे दिसत आहे.
माळशिरसमध्ये उत्तम जानकर एका गावात बॅलेट पेपरवर मतदान करणार आहेत. त्यामधून सत्य बाहेर येईल. लातुर ग्रामीणमध्ये भाजप उमेदवारांना जवळपास समान मतदान झाले आहे. हा फक्त योगायोग नाही. त्यामागे काहीतरी गडबड आहे. ईव्हीम बाबतीत कॅाग्रेस पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असतील. ९ दिवस झाले, सरकार स्थापन होत नाही.
एसटी महामंडळाच्या बस दरात 14 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केली जाणार आहेय
योजना दुतांचे वेतन थकले आहे. या योजनादुतांनी सरकारचा प्रचार केला. लाडकी बहीण योजनेसाठी अटीशर्ती टाकण्याची भाजपची तयारी सुरु झाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला.
रोहित पाटलांना प्रतोदपद देण्याचा प्रस्ताव मी सुचवला: रोहित पवार
रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी नियुक्ती देण्याची मीच शिफारस केली होती. मीच तो प्रस्ताव मांडला होता. आमच्या सर्वांची त्याला संमती आहे. आमच्याकडे एकतर नेते राहीलेले नाही. मुख्य प्रतोद महत्वाचे पद आहे. आम्ही त्यांना मार्गदर्शन करु. पक्ष भविष्यात मला योग्य पद देईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षसंघटनेत बदल करण्याची वेळ आली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील ते बदल लवकरच करतील, असे रोहित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं