एक्स्प्लोर

24 November: रविकांत तुपकर यांचे जलसमाधी आंदोलन, नवाब मलिकांना जेल की बेल याचा फैसला; आज दिवसभरात

Today's Headline 24 November: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यांना जेल की बेल याचा आज फैसला होणार आहे. या आधी महाविकास आघाडीच्या अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही जामीन मिळाला आहे. आता नवाब मलिक यांचे काय होणार याचा आज फैसला होणार आहे. या बातमीसह आज काही महत्त्वाच्या बातम्या घडणार आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते.  

रविकांत तुपकर यांचे आज जलसमाधी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी निघाले आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या 600 कार्यकर्त्यांसह 60 ते 70 गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून निघाला आहे. या आंदोलनात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा-सिल्लोड-औरंगाबाद-नगर-पूणे मार्गे जाऊन मुंबईत येणार आहे. रविकांत तुपकर यांनी आज सकाळी मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु जाहीर झालेली मदत ही तुटपूंजी असून आपण जलसमाधीवर ठाम असल्याचं तुपकरांनी म्हंटलं आहे.

बैलगाडा शर्यतींबाबत आज सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी

बैलगाडा शर्यतीबाबत महाराष्ट्र आणि जलिकट्टूबाबत कर्नाटक आणि तमिळनाडूतील प्रकरणं आज एकत्रित ऐकली जाणार आहेत. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता घटनापीठ याबाबत अंतिम निर्णय काय देणार याची उत्सुकता असेल.

पवार इन अॅक्शन मोड, आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

आजारपणानंतर शरद पवार आज पहिली बैठक घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये शरद पवार आगामी निवडणुकांसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. 

नवाब मलिकांना बेल की जेल? सत्र न्यायालय निर्णय देणार 

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. मलिक यांच्या अर्जावर दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निर्णय राखून ठेवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget