एक्स्प्लोर

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पुढील 3 दिवस कसं असणार वातावरण? हवामान विभागानं वर्तवला अंदाज 

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत आहे, तर काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण होत आहे, तर काही ठिकाणी पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना (Agriculture Crop)  मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, अशातच हवामान विभागानं पुढील 3 दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्याच्या विविध भागात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

'या' भागात पाऊस पडणार

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे. 

शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या भागात वादळी वाऱ्यासह गारपीट पडत आहे. सध्या नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, उन्हाचा तडाखा वाढला होता. अशातच दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुलं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मगं झाल्याचे दिसून येत आहेत.

वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम

वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम झाला आहे. आटगाव आणि थानशेत स्टेशनच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये पत्रा अडकल्याची घटना घडली आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं बाहेरुन पत्रा उडून ओव्हर हेड वायरवर येऊन पडला आहे. यामुळं कसऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  एक लोकल 15 मिनिटे तर त्यामागे एक एक्सप्रेस 8 मिनिटे थांबली होती. पंधरा ते वीस मिनिटे वाहतूक सुरळीत होण्यास लागली. 

भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात 

भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ आहे.  वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली आहे. सकाळपासूनच उकाडा होत असल्याने अचानक वातावरणामध्ये बदल झाला आहे. वादळी वारा व पावसामुळं काही ठिकाणी पत्रे कोसळली तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्याही पडल्या आहेत.  वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??

Embed widget