(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात हायवेंवर रोज 35 जणांचा मृत्यू! अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी हायवे पोलिसांचं नवं पाऊल
महाराष्ट्रात जवळपास 40 हजार किलोमीटर परिसरात हायवेचं जाळं पसरलं आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक गाड्या या हायवेवरुन प्रवास करत असतात. ज्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे.
Maharashtra Highway : महाराष्ट्रात जवळपास 40 हजार किलोमीटर परिसरात हायवे आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या परिसरात तितक्याच अधिक गाड्या रोज प्रवास करत असतात. त्यामुळे अपघाताची संख्याही अधिक झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र हायवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 35 जणांचा हायवे अपघातात जीव जात आहे. हे अपघात अनेकदा बांधकामातील चूक, हवामानातील बदल अशा विविध कारणांनी होत असतात. या अपघातांना रोखण्याकरता आता हायवे पोलिसांनी नवं पाऊल उचललं असून इंटिग्रेटेड रोड अॅक्सिडंट डाटाबेस नावाचं सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते वाहतूक विभागाचे अतिरिक्त महासंचालक कुलवंत सारंगल यांनी ही माहिती दिी आहे.
या सॉफ्टवेअरमुळे काही दिवसांत शासनाकडे इतकी माहिती जमा होईल की ज्याने कोणत्या क्षेत्रात किती आणि कशामुळे अपघात होत आहेत. हे स्पष्ट होईल ज्यामुळे हे अपघात रोखण्याकरत योग्य उपाययोजना यंत्रनेला करता येतील. दरम्यान महाराष्ट्रासह आणखी चार राज्यांत ही प्रणाली वापरण्यात येणार असल्य़ाचंही सारंगल यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात 1377 ब्लॅक स्पॉट्स
सारंगल यांनी पुढे बोलताना सांगितले की, महाराष्ट्रात हायवेवर 1377 च्या जवळपास ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी सतत अपघात होत असतात. महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार नाशिक ग्रामीणमध्ये यातील 98 ब्लॅक स्पॉट असून त्यानंतर सातारा येथेही 85 ब्लॅक स्पॉट असून औरंगाबादमध्ये 83 ब्लॅक स्पॉट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हजारो कोटींचं ई चलान बाकी! रिकवर करना बाक़ी!
सारंगल यांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, आतापर्यंत महाराषट्रात 5.20 कोटी व्यक्तींना विविध वाहतूकीचे नियम तोडण्यासाठी ईचलान ठोकण्यात आलं आहे. ज्यातील जवळपास 2 कोटी लोकांनी अजून ई-चलान भरलेलं नाही. त्यामुळे एकूण 2200 कोटी रुपयांपैकी 1300 कोटी रुपये अजून वसूल करणं बाकी आहे. हे पैसे न भरल्यास संबधितांना कोर्टाचे चक्कर लावावे लागू शकतात असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात हायवेवरील अपघात
2019 मध्य़े हायवेवर एकूण 32 हजार 925 अपघात झाले असून त्यात 12788 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे त्यावर्षी सरासरी 35 जणांना दररोज जीव गमवावा लागला असून 28628 लोक जखमी झाले आहेत.
2020 मध्य़े हायवेवर एकूण 24 हजार 971 अपघात झाले असून त्यात 11569 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे त्यावर्षी सरासरी 32 जणांना दररोज जीव गमवावा लागला असून 19914 लोक जखमी झाले आहेत.
2021 मध्य़े हायवेवर एकूण 29 हजार 494 अपघात झाले असून त्यात 13528 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे त्यावर्षी सरासरी 37 जणांना दररोज जीव गमवावा लागला असून 23080 लोक जखमी झाले आहेत.
हे ही वाचा-
- Sanjay Raut : ईडीच्या धाडी हा चिंतेचा नाही तर आता गंमतीचा विषय, राज्यात विरोधी पक्षांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर : संजय राऊत
- नागपूर: अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड, सीआरपीएफचे पथक मदतीला
- UPA Renovation : हिंदू समाज मुकुटमणी असल्याचं स्वीकारल्यास यूपीएचा जीर्णोधार शक्य, सामनातून काँग्रेसला सल्ला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha