एक्स्प्लोर
Vande Mataram Row : मुस्लिमांना वंदे मातरम म्हणायला लावणे चूक - आझमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अबू आझमी (Abu Azmi) यांच्या वक्तव्यांमुळे वंदे मातरमवरून (Vande Mataram) पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. 'जे काम इंग्रज करू शकले नाहीत, ते काँग्रेसने केले, काँग्रेसने मजहबी आधारावर वंदे मातरमचा एक हिस्सा काढून टाकला', असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. यावर अबू आझमी यांनी, 'द्वेष पसरवून आणि वंदे मातरमसारखे मुद्दे आणून भाजप मतांचे राजकारण करत आहे' असा पलटवार केला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० च्या दशकात 'वंदे मातरम' लिहिले, जे १८८२ मध्ये त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत प्रकाशित झाले. १९३७ मध्ये काँग्रेसने या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. या गीतातील काही कडव्यांमध्ये मातृभूमीला देवी दुर्गा संबोधल्याने आणि 'आनंदमठ' कादंबरीत मुस्लिमांच्या चुकीच्या चित्रणामुळे मुस्लिम समुदायाचा याला विरोध आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















