एक्स्प्लोर

ED Raids : नागपूर: अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीचा छापा, चौकशीसाठी घेतले ताब्यात

ED Raids in Nagpur : नागपूर येथील वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीने आज सकाळी छापा मारला. ईडीने उके यांना ताब्यात घेतले आहे.

ED Raids in Nagpur : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात उठबस असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते.  ईडीने अॅड. सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने टाकला असू शकतो अशी चर्चा सुरू आहे. 

भाजप नेत्यांविरोधात आरोप

न्या. लोया मृत्यू प्रकरणीही त्यांनी सनसनाटी आरोप करत अनेक महत्त्वाचे दावे केले होते. अॅड. सतीश उके यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आरोपही केले होते.  त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर असलेला गुन्हा लपवला असल्याची तक्रार उके यांनी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी उकेंनी केली. अॅड. सतीश उके हे जेएमएफसी कोर्टात गेले होते तेव्हा ही केस रद्द झाली होती. त्यानंतर उके यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. तेव्हा हे प्रकरण चालवण्याची परवानगी दिली. सत्र न्यायालयाच्याविरोधात फडणवीस उच्च न्यायालयात गेले होते. जिथे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय बाद ठरवण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अॅड. सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही न्यायलयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

विनयभंगाची तक्रार 

अॅड. सतीश उके यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वीच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणात त्यांचा भाऊ प्रदीप उकेदेखील सहआरोपी आहे. विनयभंगाचे प्रकरण 2007 ते 2022 या कालावधीमधील असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Embed widget