एक्स्प्लोर

Rohit Arya Encounter: खुद्द मोदींनी केलं होतं रोहित आर्यच्या 'लेट्स चेंज'चं कौतुक; तरी 17 मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ का आली? मोठी माहिती समोर

Rohit Arya Encounter: मुंबईच्या पवई परिसरात असलेल्या एका स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. मुलांची सुखरुप सुटका करताना पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्य ठार झाला.

Rohit Arya Encounter: मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. पवईतील (Powai) एका स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि कमांडो पथकाने तातडीने कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. मात्र, या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत आरोपी रोहित आर्य ठार (Rohit Arya Encounter) झाला.

Rohit Arya Encounter: सरकारी थकबाकीचा दावा

रोहित आर्य हा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या सरकारी अभियानाचा समन्वयक होता. त्याने ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प’ या उपक्रमांतर्गत राज्यभरातील शाळांमध्ये मुलांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्याचं काम केलं होतं. या प्रकल्पाद्वारे मुलांना “स्वच्छता दूत” बनवून त्यांच्या पालकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा हेतू होता. या अभियानासाठी शिक्षण विभागाने 2कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, अभियान राबविल्यानंतरही शिक्षण विभागाकडून पैसे न मिळाल्याचा गंभीर आरोप रोहित आर्यनं केला होता. त्याने सांगितले होते की, विभागाने केवळ आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात निधी दिला नाही.

Rohit Arya Encounter: उपोषण आणि आंदोलनाचा इतिहास

रोहित आर्यनं या थकबाकीच्या मागणीसाठी 2024 च्या जुलै-ऑगस्ट महिन्यात उपोषण सुरू केलं होतं. हे उपोषण शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या निवासस्थानाबाहेर करण्यात आलं होतं. उपोषणादरम्यान त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याने स्पष्ट आरोप केला होता की, शिक्षण विभागानं त्याचे 2 कोटी रुपये थकवले असून, स्वतःच्या पैशातून प्रकल्प पूर्ण केल्याचं त्याचं म्हणणं होतं.

Rohit Arya Encounter: मोदींनी केलं होतं 'लेट्स चेंज'चं कौतुक

रोहित आर्य 2013 पासून सामाजिक प्रकल्पांमध्ये सक्रिय होता. त्याने ‘लेट्स चेंज’ नावाने ‘स्वच्छता अभियान’ राबवलं होतं. हा प्रकल्प तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांना आवडला होता आणि त्यांनी त्याचं कौतुकही केलं होतं. नंतर 2022 मध्ये, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात हेच अभियान सुरू केलं.

Rohit Arya Encounter: मुलांना ओलीस ठेऊन थकबाकी वसुलीचा प्रयत्न

गुरुवारी दुपारी रोहित आर्यनं पवईतील एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांना ओलीस ठेवले. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून शिक्षण विभागाकडून आपले पैसे मिळवण्यासाठी हा टोकाचा पाऊल उचलल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसर रिकामा करून तातडीने कमांडो पथकाच्या मदतीने ऑपरेशन सुरू केलं.

Rohit Arya Encounter: चकमकीत मृत्यू

मुलांची सुटका करताना पोलिसांचा रोहितशी संवाद आणि प्रतिकार झाला. त्यावेळी झालेल्या चकमकीत रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Rohit Arya Encounter: पोलिसांनी रोहित आर्यला फोनवर दीपक केसरकरांशी का बोलून दिलं नाही? एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget