एक्स्प्लोर

Rupali Chakankar Statement Controversy: सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!

अजित पवार यांनी रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. फलटण युवती डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारे यांचा संतप्त हल्लाबोल केला आहे. त्यामुळे कारवाईची चर्चा रंगली आहे.

Rupali Chakankar statement controversy: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Maharashtra State Women Commission controversy) रूपाली चाकणकर यांच्या फलटण भेटीत केलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे राज्यात संतापाचा स्फोट झाला आहे. डॉक्टर युवतीच्या आत्महत्येनंतर पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या चाकणकर यांच्या वक्तव्यावर आता विरोधकांसह सत्ताधारी गटातूनही नाराजी व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar on Rupali Chakankar) थेट स्पष्ट केलं आहे की, “मी महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी सहमत नाही.” फलटणमधील मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबीयांशी अजित पवार यांनी रूपाली ठोंबरे यांच्या फोनवरून संवाद साधला. “मी नेहमी सत्याच्या बाजूने असतो. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी तुमच्यासोबत आहे,” असं सांगत त्यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचंही जाहीर केलं. त्यामुळे आता रूपाली चाकणकर यांना तगडा झटका बसणार का? याबाबतची चर्चा रंगली आहे.

“चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय?” सुषमा अंधारे यांचा संतप्त प्रश्न

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “पीडितेला न्याय देण्याऐवजी चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत आहेत. ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय?” असा सवाल अंधारे यांनी  पत्रकार परिषदेत केला. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “ती युवती कितीजणांशी बोलत होती याची माहिती माध्यमांसमोर देणं म्हणजे सरळ चारित्र्यहनन आहे. जरी ती कोणाशीही बोलत असेल, तरी तिला मरायच्या स्थितीत कोणी ढकललं, हे महत्त्वाचं आहे, तिच्या वागण्यावर न्यायदान करणं नाही.” तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून “आयोगावर जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, पुनर्वसनासाठी पदांचा वापर होऊ देऊ नका, पक्षाची आणि आयोगाची इभ्रत राखा,” असा सल्लाही दिला आहे.

वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

दरम्यान, महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती याच रुग्णालयात काम करत होती. या रुग्णालयामध्ये डॉक्टर युवतीला पोलिस विभागाकडून त्रास होत होता. याबाबतची चौकशी करण्यासाठी चाकणकर पोहोचल्या. त्यांनी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत म्हणाल्या की, "मी सर्व डॉक्टर, अधिकारी यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र, पोलिस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून तक्रारी होत्या. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीनवेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊनही फलटणमध्येच थांबण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबवण्यात आली," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
Mahanagarpalika Election 2026 BJP: मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
Embed widget