Sanjay Raut : ईडीच्या धाडी हा चिंतेचा नाही तर आता गंमतीचा विषय, राज्यात विरोधी पक्षांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर : संजय राऊत
ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
Sanjay Raut : महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अराजकता पसरवत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे तो नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकिल सतीश उके यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारावाई केली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्या घरावर देखील ईडीच्या धाडी पडतील यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे राऊत म्हणाले. विरोधी पक्षांच्या विरोधात आम्ही पुरावे दिले असून कारवाई होत नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. केंद्रीय यंत्रणाचा वापर करणे हा संघराज्य व्यवस्थेला धोकादायक आहे. जिथं भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तिथं कायदा समान नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजकता पसरवत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. ईडीचा वापर पाळलेल्या गंडुसारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचे राऊत म्हणाले.
दरम्यान, आज भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे वकिल सतिश उके यांच्या नागपूर येथील घरी ईडीने छापा टाकला आहे. उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकिल आहेत. उके हे नितीन गडकरी यांच्याविरोधातील याचिकेतील नाना पटोले यांचे वकिल आहेत. जमिन गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं देखील बोलल जात आहे. त्यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला आहे. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात उठबस असते.
महत्त्वाच्या बातम्या: