एक्स्प्लोर
ठाण्यात 131 जागांसाठी 805 उमेदवार रिंगणात
ठाणे: ठाणे महानगरापालिकेच्या आखाड्यात एकूण 805 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 228 जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी 805 उमेदवार रिंगणात आहेत.
3 तारखेला 1056 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 53 जणांचे अर्ज बाद ठरले. यामध्ये भाजपचे संजय घाडिगावर आणि लॉरेन्स डिसोझा, तर शिवसेनेच्या बेंदुगडे यांचा समावेश आहे.
बंडखोर थंड
शिवसेनेच्या नगरसेविका पूजा वाघ, नम्रता भोसले, अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. माजी महापौर स्मीता इंदुलकर यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णकुमार नायर, प्रमिला भांगे, निलेश लोहरे, रामदास पडवळ, हेमलाता पडवळ, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
वागळे इस्टेट इथं शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता घाग यांनी माघार घेतली असली तरी चंद्रगुप्त घाग हे मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात आहेत.
राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा पाटील यांनीसुध्दा माघार घेतली आहे. तर, नौपाड्यातून बंडखोरी करणाऱ्या चारही सेनेचे शाखाप्रमुख 'थंड' झाले आहेत.
तिकिट नाकारल्याने भाजपच्या 22 पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले होते. त्यापैकी माजी उपमहापौर सुभाष काळे विद्यमान नगरसेविका सुशिला लोखंडे यांचे पती सुनील तसेच विशाखा कणकोसे, महेंद्र जैन, निलेश कोळी, घोडबंदर परिसरातील कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, योगेश भोईर, नवनाथ पासलकर अशा जवळपास सर्वच बंडखोरांनी माघार घेतल्याची माहिती आमदार संजय केळकर आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी दिली.
शशी यादव यांनीसुध्दा माघार घेतली असली तरी त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना भाजपला धक्का
अर्जासोबत योग्य कागदपत्रे न जोडल्यामुळे शिवसेनेचे प्रभाग ६ येथील उमेदवार दिलीप बेंदुगडे यांचा अर्ज बाद झाला आहेत. तर, भाजपचे क्रमांक ३ ब येथील उमेदवार जयनाथ पुर्णेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपला तो धक्का आहे. भावाच्या निवडणूक प्रचारासाठी माघार घेत असल्याचा खुलासा पुर्णेकर यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement