एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे महापौर निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीचेही उमेदवार
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत दोन नवे ट्विस्ट आले आहेत. कारण शिवसेनेपाठोपाठ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसही महापौरपदाच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरणार आहे.
भाजपकडून महापौरपदासाठी आशादेवी शेरबहाद्दूर सिंग यांचा तर उपमहापौरपदासाठी मुकेश मोकाशी यांचा फॉर्म भरण्यात येणार आहे.
तर राष्ट्रवादीतर्फे अश्रीन राऊत यांचा महापौरपदासाठीतर उपमहापौरपदासाठी आरती गायकवाड अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेसमोर आव्हान उभं राहणार आहे.
शिवसेनेकडून मिनाक्षी शिंदेंचं नाव
ठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढावी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मीनाक्षी शिंदे यांनी यापूर्वी आरोग्य समितीचं सभापतीपदही भूषवलं आहे. मिनाक्षी शिंदे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही. तसंच घराणेशाहीला फाटा मिळावा यासाठी मीनाक्षी शिंदे यांची महापौरपदासाठी निवड करण्यात आली आहे.
131 जागांच्या ठाणे महापालिकेत 67 जागांसह शिवसेनेला पूर्ण बहुमत आहे. तर भाजप 23, राष्ट्रवादी 34, काँग्रेस 3, एमआयएम 2 आणि अपक्ष/ इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत.
संबंधित बातम्या
ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे निश्चित : सूत्र
शिवसेनेच्या प्रियांका पाटील ठाण्यातील सर्वात लहान नगरसेविका!
ठाण्यात पत्नीवर नारळ भिरकावणारे शिवसेना उमेदवार विजयीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
धाराशिव
राजकारण
निवडणूक
Advertisement