एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशावर पंकजा मुंडेंकडून शिक्कामोर्तब!
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादीने निलंबित केलं आहे. त्यामुळे ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते माजी मंत्री सुरेश धस यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादीने निलंबित केलं आहे. त्यामुळे ते आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता खुद्द पंकजा मुंडेंनीच सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते भाजपसोबत काम करायला इच्छूक असल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आष्टी इथे सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनीही हजेरी लावली. सुरेश धस हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी दिवसभर चर्चा असतानाच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या प्रवेशाची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये असं सांगितलं.
आपल्या भाजप प्रवेशावर जुन्या पक्षातीलच तथाकथित नेते हे तारखा सांगत सुटले आहेत, असं म्हणत सुरेश धस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आपल्यावर जे आरोप करत आहेत, त्यांना योग्य वेळी त्यांच्याच शैलीत उत्तर देऊ, असंही सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस गटाची पंकजा मुंडेंना मदत
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेना आणि काँग्रेसच्या एका सदस्यानेही मदत केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं.
संबंधित बातम्या :
सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडितांवर गुन्हा
कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
कानफुक्यांनी निलंबनाची कारवाई केली : सुरेश धस
सुरेश धस यांचं राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्वासघातकी म्हणू नये : धस
गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू : अजित पवार
सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement