एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्वासघातकी म्हणू नये : धस
पुणे : जे स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, ज्यांनी स्वतःच्या काकांचा विश्वासघात करुन परळी नगरपरिषद जिंकली, त्यांनी 'विश्वासघातकी' हा शब्द वापरु नये, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.
'भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा आहे. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करावी', अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरच शरसंधान साधलं.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यासाठी कुणी प्रयत्न केले, कुणी पैसे पुरवले, याची माहिती पक्ष नेतृत्वाने घ्यावी, असं सुरेश धस यांनी सुचवलं. जे स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, ज्यांनी स्वतःच्या काकांचा विश्वासघात करुन परळी नगरपरिषद जिंकली, त्यांनी 'विश्वासघातकी' हा शब्द वापरु नये, अशी बोचरी टीका धस यांनी केली.
माझ्यावर जी काय कारवाई करायची, ते पवार साहेब (शरद पवार) आणि अजित दादा ठरवतील. धनंजय मुंडे माझ्यानंतर पक्षात आले आहेत. त्यांनी माझ्यावर कारवाई करावी असं सांगू नये, असं सुरेश धस म्हणाले. मी आजही राष्ट्रवादीसोबत आहे आणि उद्याही राष्ट्रवादीसोबत असेन, असंही यावेळी सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.
विश्वासघातकी कोण आहे, दगाबाज कोण आहे, हे अख्ख्या बीड जिल्ह्याला माहित आहे. जे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत पाच हजार वेळा खोटं बोलतात त्यांनी विश्वासघातकी शब्द वापरु नये, असे बेधडक आरोपही सुरेश धस यांनी केले.
अजित पवारांनी माझ्याविरोधात फेसबुकवर लिहिलं असेल, असं वाटत नाही. अजित दादा सरळ आहेत. त्यांच्या नावानी 'यांनी'च लिहिलं असेल, असा टोलाही सुरेश धस यांनी हाणला.
माझा वाद जे स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांच्याशी आहे, पवार साहेब आणि अजित पवारांसोबत नाही, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर, सोलापूर, नाशिकमध्ये भाजपसोबत गेली, मग बीडमध्ये भाजपसोबत गेल्यावरच अशी काय आणीबाणी निर्माण झाली? असा सवालही धस यांनी उपस्थित केला.
आमच्या पक्षामध्ये लोकांमधून निवडून येणाऱ्यांपेक्षा बॅक डोअरनी येणाऱ्यांचं चलती आहे, हे दुर्दैव आहे. मात्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्यांचं काही चालत नाही, मुख्यमंत्र्यांची निवड विधानसभेच्या आमदारांतून होतं, असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं घरातील भांडण आहे. ते भांडण तुम्ही पक्षाच्या चव्हाट्यावर कसं आणता, असा उपरोधिक सवालही सुरेश धस यांनी विचारला.
धनंजय मुंडे यांचे आरोप :
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. विश्वासघातकी व्यक्तींमुळे बीड झेडपी राष्ट्रवादीच्या हातातून गेली, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
कमी जागा मिळालेल्या असताना भाजपने बीड जिल्हा परिषदेवर शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता काबीज केली आहे. 34 मतांसह भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 25 मतं मिळाली.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढलं. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेनेही मदत केली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पंकजा मुंडे सकाळीच बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. शिवाय विनायक मेटे आणि शिवसेनेचे बदामराव पंडितही उपस्थित होते. धस गटाच्या सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने बीडमध्ये आणण्यात आलं.
भाजपला मिळालेली मतं
- भाजप 20
- सुरेश धस गट 5
- शिवसंग्राम 4
- शिवसेना 4
- काँग्रेस 1
- एकूण 34
- राष्ट्रवादी- 25
- भाजपा- 19
- काँग्रेस- 03
- शिवसंग्राम- 04
- शिवसेना- 04
- काकू-नाना आघाडी- 03
- मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
- अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
संबंधित बातम्या :
गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू : अजित पवार
सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांचं भाजपला मतदान
तुमची झेडपी, तुमचा अध्यक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement